गारगोटी : माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गारगोटी : माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

3848
गारगोटी : माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याप्रसंगी उपस्थित भाग शाळा सोनाळीचे माजी विद्यार्थी.
.....
गारगोटीत ३२ वर्षांनंतर भरला
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गारगोटी, ता. ५ : येथील बेघर वसाहत भाग शाळा सोनाळी क्रमांक २ च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३२ वर्षांनी स्नेहमेळावा पार पडला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तत्कालीन शिक्षक श्रीमती मंगल हुक्केरी, गणपती कल्याणकर, उमा ढोबळे, सुधीर गदुगळे, सुनीता पाटील-निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थी व लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर, बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन कोरे यांचा सत्कार झाला. माजी विद्यार्थी महेश पटेल, सुनील साळोखे, शक्ती सारंग, रणजित तोंदले, साताप्पा वडर, मधुकर पाटील, प्रदीप खोत, राजश्री माणगावकर, मनीषा सुतार, सरिता राऊत, साऊ तोंदले, गीता सोरटे, सारिका देसाई, मनीषा पाटील, योगिता देसाई , सुरेखा सुतार, अलका कांबळे आदी उपस्थित होते.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com