गारगोटीत ११६० कामगारांची नोंदणी

गारगोटीत ११६० कामगारांची नोंदणी

Published on

गारगोटीत ११६०
कामगारांची नोंदणी

गारगोटी : ‘बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विविध शासकीय योजना गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत,’ असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी केले. येथे बांधकाम कामगार थम कँप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ११६० कामगारांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाथाजी पाटील फाउंडेशनच्यावतीने हा कार्यक्रम झाला. अविनाश कवडे, दीपक पाटील यांनी कॅम्पचे आयोजन केले होते. प्रा. धनाजी मोरस्कर, नामदेव चौगले,भगवान शिंदे, पांडुरंग वायदंडे, रणजीत आडके, गारगोटी ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगले, मोहन सूर्यवंशी, सचिन देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.