राधानगरीत ४२५ केंद्रांवरील यंत्रणा सज्ज
4255, 4256
गारगोटी : मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य घेऊन जाताना कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात मौनी विद्यापीठाच्या मैदानावर मतदान केंद्रावर कर्मचारी व साहित्य नेण्यासाठी उभा असलेला वाहनांचा ताफा.
.......
‘राधानगरी’त ४२५ केंद्रांवरील यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणूक : तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. १९ : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ४२५ मतदान केंद्रांवर बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त केले आहे. मंगळवारी दुपारी प्रत्येक केंद्रावर मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सूळ यांनी दिली.
सूळ म्हणाले, ‘राधानगरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४४ हजार ४४२ मतदार आहेत. राधानगरी तालुक्यात २०५, भुदरगड तालुक्यात १७२, तर आजरा तालुक्यातील एका जिल्हा परिषद मतदारसंघात ४८ मतदान केंद्रे आहेत. राधानगरी तालुक्यात १ लाख ७३ हजार २५३, भुदरगड तालुक्यात १ लाख ३३ हजार ६२, तर आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघात ३८ हजार १०७ मतदार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी अर्चना पाटील यांनी दिली. गारगोटीतील शाहू कुमार भवन, सार्वजनिक बांधकाम विभागासह १७ मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या थीम करण्यात येणार आहेत. मतदारसंघात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन, पोलिस कर्मचारी, होमगार्ड असे सुमारे तीन कर्मचारी निवडणुकीसाठी कार्यरत आहेत.
पोलिस उपअधीक्षक मृत्युंजय हिरेमठ व पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ८०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. ६५ बस व ४८ जीपमधून मतदान कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रावर रवाना झाले.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

