
दलित महासंघातर्फे हातकणंगलेत मोर्चा
03073
हातकणंगले ः नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना राजीव आवळे, विजय चौगुले, मोहन चौगुले आदिंनी निवेदन दिले.
-----------
दलित महासंघातर्फे हातकणंगलेत मोर्चा
हातकंणगले, ता. ३१ ः सांगलीमध्ये सत्यशोधक आण्णाभाऊ साठे यांच्या पतुळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर याचे आम्ही पाईक आहोत. या सर्व समाज सुधारकांनी जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे असे गैरकृत्य करण्याचे धाडस कोणीही करू नये, असा इशारा माजी आमदार राजीव आवळे यांनी दिला. विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हातकंणगले तहसिल कार्यालयावर निषेध व तिरडी मोर्चा दलित महासंघातर्फे काढला. यावेळी ते बोलत होते. नायब तहसीलदार दिगंबर सानप यांना निवेदन दिले. मोर्चाला हातकंणगलेतून सुरवात झाली. मोर्चामध्ये तिरडीची प्रतिकृती केली होती. मोर्चा वीज महामंडळ कार्यालयमार्गे तहसिल कार्यालयाकडे आला. मोर्चामध्ये विटंबना करणाऱ्याच्या निषेधाच्या व समाज सुधारकाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. मोर्चा तहसिल कार्यालयासमोर आल्यानंतर तिरडीचे दहन केले. मोर्चामध्ये मोहन चौगुले, विजय चौगुले, राहूल हातकणंगलेकर, रोहित माटे, सुरज मोहिते, अमोल कांबळे आदी सहभागी झाले होते.