हातकणंगले आज रोटी डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातकणंगले आज रोटी डे
हातकणंगले आज रोटी डे

हातकणंगले आज रोटी डे

sakal_logo
By

हातकणंगलेत आज ‘रोटी डे’
डांगे महाविद्यालय, आय एम कलाम फाउंडेशनतर्फे आयोजन
हातकणंगले, ता. १३ ः सध्या तरुणाईमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. अनेकजण फेब्रुवारीचा दुसरा आठवडा म्हणजेच ८ ते १४ पर्यंत व्हॅलेंटाईन वीकचे वेगवेगळे डे साजरे करतात. मात्र हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय (एन.एस.एस. विभाग) व आय एम कलाम फाउंडेशनचे काही तरुण हाच प्रेमाचा आठवडा समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करतात.
मागील सहा वर्षांपासून या तरुणांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला फाटा देत ‘रोटी डे’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार, अनाथ, वयोवृद्ध, फिरस्त्यांना मदत पोहोचवतात. ७ ते १३ दरम्यान हे तरुण महाविद्यालयातून मदत संकलित करतात व संकलित केलेली मदत परिसरातील गरजू, निराधार, उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवतात.
यावर्षी महाविद्यालयात ‘रोटी डे’साठी मदत संकलन सुरू आहे. उद्या (ता. १४) महाविद्यालयात घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील वृद्ध व संस्थापक बाबासो पुजारी यांना आमंत्रित केले आहे. महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला आहे. श्री. पुजारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले आहे. ‘रोटी डे’निमित्त संकलित मदत यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या स्वाधीन केली जाईल, असे अनिस मुजावर यांनी सांगितले. उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. योजना जुगळे, माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनीता तेलसिंगे, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रयत्न करत आहेत.