लिंगायत गण मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगायत गण मेळावा
लिंगायत गण मेळावा

लिंगायत गण मेळावा

sakal_logo
By

जयसिंगपुरात २५, २६ मार्चला
अठरावा लिंगायत गण मेळावा

जगद्‍गुरू बसवकुमार स्वामी यांची माहिती

हातकणंगले, ता. २० ः महाराष्ट्रासह कर्नाटकातील लिंगायत बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या अल्लमगिरी येथे गेल्या सतरा वर्षांपासून लिंगायत गण मेळाव्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी १८ व्या लिंगायत गण मेळाव्याचे आयोजन केले असून, हा मेळावा हरी ओम मल्टिपर्पज हॉल जयसिंगपूर येथे २५ व २६ मार्चला होणार असल्याची माहिती जगद्‍गुरू अल्लमप्रभूयोगपीठाचे पिठाध्यक्ष पू.श्री. जगद्‍गुरू बसवकुमार स्वामी यांनी दिली. ते हातकणंगले येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
बसवकुमार स्वामी म्हणाले, ‘श्री कुडल संगम येथील श्री बसव धर्म पीठ व महाराष्ट्रातील राष्ट्रीय बसव दल, लिंगायत गण मेळावा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात पहिल्या दिवशी म्हणजे २५ मार्चला सकाळी १० वाजता २५ हजार सामूहिक इष्ट लिंग पूजा कार्यक्रम उद्‍घाटन सोहळा, अल्लमप्रभू जयंती उत्सव, अल्लमप्रभूंचे वचन-पठण व धर्म चिंत्तन, चर्चा गोष्टी, प्रवचन, अल्लमप्रभू दिव्यालयापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत ज्योती आणण्याचा उत्सव आदी, तर २६ मार्चला राष्ट्रीय बसवदल समावेश व राष्ट्रीय बसवदलात महिला संघटना महत्त्वाची या विषयावर चर्चासत्र, पिठारोहण आदी कार्यक्रम व लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म मान्यतेसासाठी चर्चासत्र व या कार्यक्रमानंतर लिंगायत गण मेळावा कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.’
अल्लमगिरी परिसर विकासासाठी योगपीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, काही धर्म विघ्न प्रवृत्तींकडून त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे. अठराव्या गणमेळाव्याच्या तोंडावरच काही वर्षांपासून वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने हा कार्यक्रम जयसिंगपूर येथे घ्यावा लागत असल्याची खंत पू. श्री. बसवकुमार स्वामी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेस पू.श्री. बसवप्रकाश स्वामीजी, सद्‍गुरू अनमी शानंद स्वामीजी, पू श्री सदगुरू, विजया अंबिके माताजी उपस्थित होत्या.
....................