हातकणंगलेसाठी भरघोस निधी

हातकणंगलेसाठी भरघोस निधी

03152
हातकणंगले ः रुई फाटा ते हातकणंगले रस्त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे आदी उपस्थित होते.
----------
हातकणंगलेसाठी भरघोस निधी
आमदार राजूबाबा आवळे; रस्ता कामाचे उद्‍घाटन
हातकणंगले, ता. २६ ः माझ्या मतदारसंघाचे मुख्यालय असलेल्या हातकणंगलेसाठी आजवर कोट्यावधींचा निधी दिला आहे. यापुढेही भरघोस निधी देण्याचे आश्वासन आमदार राजूबाबा आवळे यांनी दिले. उर्वरित कामासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तत्काळ देण्याची सूचना त्यांनी केली
हातकणंगले येथील आंबेवाडी येथे आमदार राजू बाबा आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून रुई फाटा ते हातकणंगले या दोन कोटी साठ लाख रुपये च्या रस्त्याचा कामाचे उद्‍घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
अजितसिंह पाटील, अभिजीत इंगवले, गिरीश इंगवले, बाळासाहेब वरुटे, नूरमोहम्मद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी प्रास्ताविक केले. विजय खोत यांनी आभार मानले. महादेव पवार, उपनगराध्यक्ष केतन कांबळे, बांधकाम सभापती विजय खोत, आरोग्य सभापती प्राजक्ता उपाध्ये, पाणीपुरवठा सभापती जयश्री कांबळे, रोहिणी खोत, फरीदा मुजावर, विश्वास इंगवले, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सचिन बोराडे, राजू नलावडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com