रेणूका माता प्रतिष्ठापना महोत्सव

रेणूका माता प्रतिष्ठापना महोत्सव
Published on

04760
हातकणंगलेत रेणुकामाता
मंदिरात कलशारोहण
हातकणंगले ता. २६ ः येथील रेणुकामाता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व वास्तुशांतीनिमित्त शुक्रवारी (ता. २५) मुहूर्तमेढ, मंडपपूजन, जातीपूजन आणि सुहासिनी पूजनाचा कार्यक्रम सौ. व श्री. रंगराज सुदेश मोरे, सौ. व श्री. अण्णाप्पा देवापा खोचगे आणि सौ. व श्री. दिलीप शिवगोंडा पाटील यांच्याहस्ते झाला.
दुपारी सुदेश मोरे व प्रदीप खोचगे यांच्याहस्ते मूर्ती प्रदक्षिणा झाली. रात्री नवीन मूर्ती स्थापना झाली. यानिमित्त बुधवारी (ता . ३०) धार्मिक विधी, हवनपूजन, गणेशपूजन, पुण्याहवाचन, नवग्रह पूजन, गंगापूजन आणि अभिषेक होतील. गुरुवारी (ता. ८) जग भरणीचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमास गुरुवर्य रंजीता नायक, जरीना नानी, मनीषा मम्मा, तसेच मधू जाधव, महादेव शिवाचार्य महाराज, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, माजी सरपंच संदीप कारंडे, माजी सरपंच अजित पाटील उपस्थित राहणार असून श्वेता व विश्वविजय सुदेश मोरे यांच्याहस्ते महाप्रसादाचे वाटप होणार आहे. भाविकांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहान शाहू कॉर्नर व वेताळ चौक हातकणंगले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com