मिलच्या बेल्टमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू: एक जखमी

मिलच्या बेल्टमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू: एक जखमी
Published on

मिलच्या बेल्टमध्ये अडकून
परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
हातकणंगले ः मजले (ता. हातकणंगले) येथे बुधवारी सायंकाळी राईस मिलमध्ये मशीनच्या बेल्टमध्ये अडकून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. उवेसकुमार पोपीराम दिवाकर (वय १८, रा. सरकाडी, उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्याचे तर राहुल राजवीर सिंग (२७, रा. सरकाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली. मिलच्या नूतनीकरणावेळी ऐशी फूट उंचीवर मशीनरी बसविण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हातकणंगले रुग्णालयात हलविला. कोल्हापूरच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com