

05759
नरंदे (ता. हातकणंगले) : येथे सायकल वाटपप्रसंगी प्रतापराव देशमुख, नमिता देशमुख, प्रकाशराव भंडारी, विजयसिंह देसाई, डी. एन. कुलकर्णी, एस. टी. गावडे, हर्षवर्धन देशमुख व मान्यवर.
नरंदे हायस्कूलमध्ये सायकल वाटप
हातकणंगले, ता. २३ : नरंदे (ता. हातकणंगले) येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल, देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल, डी. एड. कॉलेज, निवासी- अनिवासी मुले-मुली शिक्षण संकुलमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे वीसहून अधिक सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
निवृत्त मुख्याध्यापक एस. टी. गावडे, मुख्याध्यापक हर्षवर्धन देशमुख यांचा प्रकाश भंडारी यांच्यातर्फे विशेष सत्कार झाला.
प्रकाश भंडारी यांच्यातर्फे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. डी. एन. कुलकर्णी म्हणाले, ‘‘संस्थेतर्फे वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये सहभाग घ्यावा.’’ प्रतापराव देशमुख यांनी शाळेचा ३५ वर्षांचा इतिहास सांगून सध्याच्या निकालाची गौरवशाली परंपरेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सेक्रेटरी नमिता देशमुख, अधीक्षक विजयसिंह देसाई, मुख्याध्यापक एच. पी. देशमुख, पर्यवेक्षिका एम. जी. चौगुले, डी. एन. कुलकर्णी, एस. टी. गावडे, प्रकाशराव भंडारी, मुख्याध्यापक देशमुख, पर्यवेक्षिका एम. जी. चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलाणी, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. वाय. एम. बोराटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.