
...तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही
02162
हुपरी : श्री बाळूमामा मंदिर व श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी आमदार राजुबाबा आवळे यांचा घोंगडी व ढोल भेट देऊन धनगर समाजातर्फे सत्कार केला. लालासाहेब देसाई, अरिहंत बल्लोळे आदी उपस्थित होते.
------------
...तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही
आमदार राजुबाबा आवळे; हुपरीमध्ये सुशोभिकरणाचा प्रारंभ
हुपरी, ता.११: भाजप सरकार आल्यापासून रोजच्या जगण्यासाठीच्या वस्तूंचे दर अमाप वाढले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. रोजगार नाही. एकमेकांची मने कलुषित होतील अशा पद्धतीने द्वेषाचे राजकारण केले जात आहे. यापासुन मुक्ती मिळवायची असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार राजुबाबा आवळे यांनी येथे केले.
येथील माळभागातील संत श्री बाळूमामा मंदिर व श्री दत्त मंदिर परिसरात आमदार निधितून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाचा प्रारंभ आमदार आवळे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, मानसिंगराव देसाई, भरत वाळवेकर, लालासाहेब देसाई, धर्मवीर कांबळे, रफीक मुल्ला, जयकुमार माळगे, गणेश वाईंगडे, बाळासाहेब मुधाळे, सज्जन चव्हाण, प्रशांत जाधव, प्रकाश मोरबाळे, प्रकाश देशपांडे शाहू म्हेत्रे, अमर कलावंत आदी मान्यवर उपस्थित होते. रघुनाथ मुधाळे, काशिनाथ मुधाळे, अरिहंत बल्लोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व आभार रघुनाथ मुधाळे यांनी केले.