
"हे मानवा सत्संग कर.." प्रवचन संग्रह पुस्तकाचे हूपरीत प्रकाशन
02176
चित्त शुद्धीसाठी
सत्संगाची गरज
ईश्वर महास्वामीजी; रेंदाळला प्रवचनमाला
हुपरी, ता.२१ : ‘कष्ट करून थकलेल्या शरीराची तहान पाण्याद्वारे भागवता येते. कपड्यांची मलीनता साबणाने व पाण्याने घालवता येते, पण राग, द्वेष, मत्सरांने अशुध्द झालेले मन स्वच्छ करण्यासाठी चांगल्या पवित्र विचारांची गरज असते. त्यासाठीच सद्गुरू सत्संग पाहिजे, असे उदगार महेशानंद महास्वामीजी उर्फ ईश्वर महास्वामीजी (योगाश्रम हंचीनाळ) यांनी काढले.
रेंदाळ येथे महाशिवरात्री उत्सव मंडळातर्फे आयोजीत प्रवचनमालेत श्री ईश्वर महास्वामीजी बोलत होते. यावेळी ह.भ.प. बाळ महाराज (रेंदाळ) उपस्थित होते. गत महिन्यात पार पडलेल्या ईश्वर महास्वामीजी यांच्या प्रवचन मालेतील संग्रहित प्रवचनावर आधारित "हे मानवा सत्संग कर.." या अशोक बा. पिंपळे (हुपरी) लिखित पुस्तकाचे प्रकाशन बाळ महाराज व ईश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. सुभाष दिवटे, किसन खोत, प्रकाश कुंभार, सुभाष माळी, किरण वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
"""""""''
रेंदाळ : पुस्तकाचे प्रकाशन करताना बाळ महाराज व ईश्वर महास्वामीजी महाराज. शेजारी किसन खोत, प्रकाश कुंभार, अशोक पिंपळे, डॉ. सुभाष दिवटे आदी.