हुपरी इंगळी दरम्यान भेग पडल्याने रस्ता खचला

हुपरी इंगळी दरम्यान भेग पडल्याने रस्ता खचला

Published on

02413
हुपरी: भेग पडल्याने रस्ता खचला आहे.
...

हुपरी- इंगळी दरम्यान भेग पडल्याने रस्ता खचला

हुपरी: हुपरी- इंगळी दरम्यान कोल्हापुरे मळा येथील रस्ता पावसामुळे खचला असून रहदारीला धोका निर्माण झाला आहे. पालिका व पोलिस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. सुमारे पन्नास मीटरपर्यंतच्या रस्त्यास भेग पडून त्याचा भराव लगतच्या ओढ्यात गेला आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता एकाबाजूने खचू लागला आहे. ही बाब निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक किशोर शिंदे व मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी दक्षता घेत मार्गावरील वाहतूक बॅरिकेट लावून बंद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.