पर्यटनदृष्ट्या हुपरीचा विकास करण्याची मागणी

पर्यटनदृष्ट्या हुपरीचा विकास करण्याची मागणी

पर्यटनदृष्ट्या हुपरीचा
विकास करण्याची मागणी
हुपरी : येथील पारंपरिक पैंजणांसह अन्य चांदीच्या दागिन्यांना वाणिज्य व हस्तकला उद्योग व्यवसाय मंत्रालयाकडून नुकतेच जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना येथील चांदी पैंजण निर्मितीचे काम प्रत्यक्ष पाहता यावे, तसेच त्यांना चांदीचे दागिने खरेदी थेट करता यावेत, यासाठी पैंजण खरेदी दालन उभा करावे, तसेच हुपरी शहर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावे, अशी मागणी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनतर्फे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे संचालक मोहन खोत, जितेंद्र देशमुख, चेतन देशपांडे, शामराव शिंदे, संदीप अडसुळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com