हुपरी पाणी योजनेच्या चौकशीच्या मागणीसाठी हिंदू महासभेचे उपोषण सुरू

हुपरी पाणी योजनेच्या चौकशीच्या मागणीसाठी हिंदू महासभेचे उपोषण सुरू
Published on

पाणीपुरवठ्याच्या चौकशीसाठी
हुपरीत हिंदू महासभेतर्फे उपोषण
हुपरी, ता. ६ ः शहराच्या ४६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या शहर शाखेतर्फे आजपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
महासभेचे उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, शिवाजी शेटके उपोषणात सहभागी झाले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष प्रकाश रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्ते मागणीवर ठाम असल्याने रात्री उशिरापर्यंत मार्ग निघालेला नाही. पाणी योजनेची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने उलटले त्यानंतर उशिराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ठोस प्रगती नसतानाही प्रकल्पाला वर्षाची मुदतवाढ देण्याचे नेमके कारण काय; तसेच ६ केजी व ४ केजी क्षमतेच्या पाईप वापराबाबत तांत्रिक गोंधळ, तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला व्हॉल्व्ह कनेक्शन जोडले जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठीचे सल्लागार व संबंधित समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी, तसेच योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करावा, अशा मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com