इचलकरंजी मनपास दोन कोटी

इचलकरंजी मनपास दोन कोटी

इचलकरंजी पालिकेस
दोन कोटींचा निधी
इचलकरंजी, ता. २२ : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये महापालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा इमारतीसाठी एक कोटी, जयभवानी शाळा क्रमांक ३९ मध्ये कॉम्प्युटर लॅब तयार करण्यासाठी २५ लाख रुपये तर ड्रेनेज कम- सक्शन कम जेटींग वुईथ वॉटर रिसायकलर सिस्टीम मशिन खरेदीसाठी ७५ लाख निधीचा समावेश आहे. हा शंभर टक्के निधी शासनाकडून मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली. टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ येथे सुमारे बाराशे विद्यार्थी शिकत आहेत. या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा नसल्याबद्दलच्या बराच वेळा तक्रारी पालकांकडून आणि शिक्षकांकडून झाल्या होत्या. यानंतर माने यांनी त्याची पाहणी करून याबद्दलची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून खासदार धैर्यशील माने यांनीही याचा पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी या शाळेस एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. शहरातील जय भवानी शाळा क्रमांक ३९ या ठिकाणी तीन शाळाचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. येथील शिक्षक व पालक यांच्या एकत्रित मागणीनुसार या शाळेच्या कॉम्प्युटर लॅब निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून २५ लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी लहान बोळ आणि बऱ्याच ठिकाणी दाट लोकवस्तीमुळे महापालिकेची मैला सक्शन वाहन या ठिकाणी जाऊ शकत नाही. महापालिकेला जेटिंग कम सक्षम मशीनची गरज होती. ही बाब माने यांनी खासदार माने यांच्या लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी ही ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या तिन्ही घटकांवरील निधी मंजुरीचा एकत्रीत अध्यादेश आज नगरविकास विभागाने जारी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com