औद्योगिक क्षेत्रात आगीचे प्रमाण अधिक

औद्योगिक क्षेत्रात आगीचे प्रमाण अधिक

लोगो ः अग्नि सुरक्षा भाग - १
----------
01602
इचलकरंजी : इचलकरंजी-चंदूर मार्गावरील ओढ्यानजीक असलेल्या गुंज व स्क्रॅपच्या गोदामांना आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.
----------
इचलकरंजी हे औद्यागिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. उद्योगधंद्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी शहरात कारखाने, घरे, तसेच अन्य ठिकाणी आगीच्या घटना वारंवार घडत असतात. आगीचे प्रमाण वाढत असताना ही आग विझवण्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीच्या वापराबाबत उदासिनता दिसून येते. परिणामी लाखो रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात होताना दिसते. इचलकरंजी महापालिकेचे अग्निशामक दल असले तरी त्यांनाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे वस्त्रनगरीमधील अग्नी सुरक्षेची सध्याची स्थिती व महत्व विषद करणारी मालिका आजपासून...
----------------

औद्योगिक क्षेत्रात आगीचे प्रमाण अधिक
इचलकरंजी मनपाच्या अग्निशामक दलाला मर्यादा; साधनसामुग्री वापराबाबत उदासिनता
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ः शहरात लागणाऱ्‍या आगीमध्ये अधिकतर कारखाने, स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन यासह कापूस, कार्टन ठेवण्याची गोदामे यांचा समावेश आहे. आग लागलेल्या बहुतांशी ठिकाणी आग शमवणारे यंत्र नसल्याचे दिसून आले आहे. ज्वलनशील साहित्य असतानाही आग विझवण्यासाठी असणाऱ्‍या उपकरणांचा अभाव दिसतो. त्यामुळे औद्योगिक ठिकाणी अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे. यासोबत अग्निशमन यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे चार लाखाच्या घरात आहे. शहराचा मुख्य व्यवसाय वस्त्रोउद्योग असल्याने त्यावर आधारीत इतर व्यवसायांची संख्या ही अधिक आहे. शहर परिसरामध्ये चार इंडस्ट्रीयल इस्टेट असून त्यामध्ये ८० प्रोसेस, २०० सायझिंग, एक लाख यंत्रमाग आहेत. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्‍या वेस्टेजचे प्रमाण अधिक आहे. ते ठेवण्यासाठी शहर परिसरामध्ये व्यावसायिक पत्र्याची शेड उभी करत आहेत. आग जलद पकडणारे वेस्टेज असताना ही येथे आगीपासून बचाव करणारी यंत्रणा दिसत नाही. त्यामुळे अनेक छोट्या आगीसाठीही आग्निशामक वाहनास पाचारण करावे लागते. या कलावधीत आग रौद्ररूपधारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इचलकरंजी-चंदूर मार्गावरील ओढ्यानजीक असलेल्या गुंज व स्क्रॅपच्या गोदामांना आग लागून कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले होते. २०१६ मध्ये औद्योगिक वसाहत शहापूर येथे एका कारखान्याला आग लागली होती. त्यावेळी इचलकरंजी अग्निशामक दलाच्या चार गाड्या व इतर ठिकाणाहून चार गाड्या मागवल्या होत्या. तरीही आग आटोक्यात आणण्यासाठी तीन दिवस लागले होते.
शहराच्या सीमा भागात अनेक ठिकाणी स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन ठेवण्याची गोदामे आहेत. या गोदामांचे बांधकाम ही बंदीस्त स्वरूपाचे असल्याने आग वाढण्यास मदत होते. आगीमुळे आर्थिक हानी होत आहे. एखाद्याला जीव गमवावा लागू नये यासाठी गोदामे, कारखाने यांचे फायर ऑडिट करून अग्निशामक उपकरणांची सक्ती करणे गरजेचे बनले आहे.
------------------
आगीची शक्यता ठिकाणी फायर बॉल प्रभावी
फायर बॉल हा आगीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे. प्राथमिक स्वरुपात असलेली आग कोणाच्याही मदतीशिवाय विझविणे शक्य होत आहे. तीन ते पाच सेकंदात आगीची तीव्रता ७० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर फायर बॉलचा स्फोट होता. कोणाच्याही मदतीशिवाय आग प्रभावीपणे विझवली जाते. या फायर बॉलचे प्रभावी क्षेत्र तीन घनमीटर आहे.
--------------
इचलकरंजी कामगारांचे शहर असल्याने येथे वाढीव भागामधून दाटीवाटीच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अग्निशामक दलास काहीसा कालावधी लागत असतो. अशा वेळी प्राथमिक स्वरुपातील असलेली आग मोठी होण्याची शक्यता असते. कारखाने, गोदामे, यासह अन्य छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी फायर सिलेंडर,फायर बॉल ठेवल्यास आगीच्या सुरवातीस नियंत्रण मिळू शकते व होणारे नुकसान टळू शकते.
-संजय कांबळे, अग्निशामक विभाग प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com