सुळकूड योजना बैठक

सुळकूड योजना बैठक

सुळकूड पाणी योजनेप्रश्नी ११ सप्टेंबरला मुंबईत बैठक

इचलकरंजी, ता.२१ ः इचलकरंजी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत ११ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची बैठक बोलवली आहे. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी त्यांची आज मुंबईत भेट घेवून बैठक घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेण्याबाबतची सूचना जलसंपदा विभागाला दिली आहे. बैठकीस मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
खासदार माने यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून त्यांना इचलकरंजीतील पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तसेच त्यांना या संदर्भात पत्रही दिले. शहरासाठी अपुरे पाणी उपलब्ध होत असून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सुळकूड योजना शासनाने मंजूर केली आहे. पण गैरसमाजातून काही गावांतून या योजनेला विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेवून या योजनेबाबत मार्ग काढणे आवश्यक आहे, असे खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर बैठक घेण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले.
-----
तातडीने मागवली माहिती
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर शासन पातळीवर पुढील कार्यवाहीला गती आली आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवाकडून सुळकूड योजनेबाबतची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने मागवली आहे. त्यासाठी २९ आॅगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. मुलाखत कक्षाकडे प्रत्यक्ष तसेच संबंधित संकेतस्थळावरही याबाबतची माहिती देण्याबाबतचे पत्र उपसचिव नितीन दळवी यांनी जारी केले आहे.
---
उद्याचा मोर्चा, इचलकरंजी बंद स्थगित
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता.२३) इचलकरंजी बंद व प्रांत कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे. याबाबतची घोषणा सुळकूड पाणी योजना कृती समितीने केली.
या प्रश्नाबाबत मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करण्याबाबत तातडीने प्रयत्न केल्याबद्दल खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, रविंद्र माने, विठ्ठल चोपडे यांचे कृति समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात बैठक लावली असल्याचे समजल्यानंतर तातडीने कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये इचलकरंजी बंद व मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समितीतील सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com