रक्षाकुंड दुरावस्थेची उपायुक्तांकडून पाहणी
इचलकरंजीत रक्षाकुंडाच्या
दुरवस्थेची उपायुक्तांकडून पाहणी
इचलकरंजी, ता. ७ : पंचगंगा स्मशानभूमी येथील रक्षाकुंडाची दुरवस्था झाली आहे. परिणामी रक्षा पुन्हा नदीत विसर्जित होऊन प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत ‘सकाळ’ने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाचे अभियंता महेंद्र क्षीरसागर व आरोग्य विभागाचे विजय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्षा उठाव जलद व्हावा, तसेच रक्षा चाळून गैरप्रकार करत असलेल्या समाजकंटकांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून पोलिसांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याचेही सांगितले.
इचलकरंजी पंचगंगा स्मशानभूमी मध्ये दहनविधीनंतर जमा होणारी राख पंचगंगा नदीमध्ये टाकण्यात येत होती. परिणामी नदीतील पाणी दूषित होत होते. नदीचे वाढणारे प्रदूषण कमी होण्यासाठी दीपस्तंभ युवा मंचच्या माध्यमातून स्मशानभूमीमध्ये दोन रक्षाकुंड उभारले. नागरिकही उपक्रमास प्रतिसाद देत रक्षा कुंडात रक्षा विसर्जित करत आहेत. मात्र सध्या हे दोन्ही रक्षाकुंड खालच्या बाजूने फुटले आहेत. त्यातून रक्षा बाहेर पडत असल्याने नातेवाईकांच्या भावना दुखवण्याची शक्यता निर्माण झाली होती. रक्षा बाहेर पडून स्मशानभूमी लगत थर साचत होता. याबाबत ‘सकाळ’ने महापालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महापालिका प्रशासन खडबडून जागे होत रक्षा कुंडाच्या दुरूस्तीचे आदेश दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

