

03295
इचलकरंजी : विविध मागण्यांसाठी लालबावटा बेघर संघटनेतर्फे सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
इचलकरंजीत बेघरांचा मोर्चा
रेंदाळमधील गायरान जमीन देण्याची मागणी
इचलकरंजी, ता. ६ ः रेंदाळमधील गायरान जमीन बेघरांना मिळावी, अन्नसुरक्षा योजनेतील धान्य वाटप वाढवावे, आदी विविध मागण्यांसाठी लाल बावटा बेघर (आयटक) संघटनेतर्फे आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिरस्तेदार संजय काटकर यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले.
मोर्चाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून झाली. शिवतीर्थ मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
निवेदनात रेंदाळ येथील गट क्रमांक १२४२ व १२४५ मधील गायरान जमीन बेघरांना द्यावी. यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित महसूल कार्यालयात सादर केले असून, ग्रामसभेत ठराव क्रमांक ४१ मंजूर झाला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रत्येक लाभार्थ्यास चार गुंठे जागा द्यावी. तसेच अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य कोठा वाढवून लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळावे. याशिवाय डिजिटल रेशनकार्ड पुरवठा विभागातून मिळावे, वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये करावी, तसेच ज्येष्ठ नागरिक पेन्शनसाठी वयोमर्यादा ६५ ऐवजी ६० वर्षे करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या. याबाबत १ मेपर्यंत निर्णय न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर महिलांचे उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला. मोर्चात रघुनाथ कांबळे, मौला नदाफ, रघुनाथ देशिंगे, आनंदा गुरव, बनुबीन नदाफ, दिलावर मोमीन, मारुती करडे, तानाजी कुंभार, मारुती पाटील, उत्तम चव्हाण, संजय कोळी, सुजाता मोहिते, सातिशीर सागर, सचिन काळे, रामा जाधव आदी सहभागी झाले होते.
०३२९५
ICH26B03295
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.