

बाळनाथ महाराज जयंतीनिमित्त
आजपासून विविध कार्यक्रम
इचलकरंजी ः रावळ समाज व भक्त मंडळातर्फे सद्गुरू बाळनाथ महाराज यांच्या १३४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, तसेच २०० व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवार (ता. २३) ते मंगळवार (ता. २८) या कालावधीत बाळनाथ महाराज मठ, गुजरी पेठ येथे होणार आहे. दररोज सकाळी ६ ते ९.१५ या वेळेत अभिषेक व आरती, सायंकाळी ६.३० वाजता नित्य आरती. सोमवारी (ता. २७) दुपारी चार वाजता पालखी सोहळा. ही पालखी शंभूतीर्थ (मलाबादे चौक) ते गुजरी पेठ मार्गाने निघणार आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळी आठ वाजता महाअभिषेक व महाआरती होईल. सकाळी १०.३० वाजता सद्गुरू बाळनाथ महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. दुपारी १२ वाजता महाआरती व त्यानंतर १२.१५ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.
--
शाहू हायस्कूलमध्ये
‘मल्टिस्किल’ अभ्यासक्रम
इचलकरंजी ः बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञानावर रोजगार मिळणे कठीण होत असताना नगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलने कौशल्याधारित शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळेत राबविण्यात येणारा ‘मल्टिस्किल टेक्निशियन’ हा व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमात इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, शेती, अन्नप्रक्रिया आणि हेल्थकेअर अशा सात क्षेत्रांचा समावेश आहे. ‘टाइम सेंटर लर्निंग लिमिटेड’मार्फत कुशल प्रशिक्षकांची निवड केली जात आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. सोबत प्रात्यक्षिकांवर भर दिल्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करत शिकत आहेत. मुख्याध्यापक शंकर पोवार यांच्या मार्गदर्शनात शिक्षक नीतेश शिंदे हा उपक्रम प्रभावीपणे राबवित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.