शंका असल्यास प्रशासनासी संपर्क साधा

शंका असल्यास प्रशासनासी संपर्क साधा
Published on

00089
पट्टणकोडोली ः रेशनकार्ड, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले वाटप करताना मौसमी चौगुले.

शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधा
मौसमी चौगुले ः पट्टणकोडोलीत महसूल विभागाचे मार्गदर्शन शिबिर

पट्टणकोडोली, ता. २६ : ‘नागरिकांनी महसूल कार्यालयात असणारी कामे स्वतः करावीत. यामुळे एजंटगिरी करणाऱ्यांना चाप बसेल. काहीही शंका असेल तर कार्यालयीन वेळेत अधिकाऱ्यांशी संपर्क करा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा शिबिराचा उद्देश आहे. यापुढेही असे उपक्रम गावपातळीवर राबवले जाणार आहेत,’ असे प्रतिपादन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी केले.
येथील न्यू राजापूर वसाहतीमध्ये महसूल विभागातर्फे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर झाले. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी ग्रामस्थांना विविध महसूलविषयक योजनांची माहिती दिली. इचलकरंजी अपर तहसीलदार सुनील शेरखाने उपस्थित होते. शिबिरात ७/१२ उतारा, फेरफार, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ई-फेरफार प्रक्रिया, तसेच महसूल न्यायालयीन प्रकरणांबाबत माहिती दिली. नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. चित्रीकरणाच्या माध्यमातून रुई मंडल अधिकारी जानकी मिराशी यांनी महसूल कागदपत्रांची माहिती दिली. इचलकरंजी अपर तहसीलदार सुनील शेरखाने, हुपरी मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, तलाठी पूजा सावंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com