सुधारित हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित हल्ला
सुधारित हल्ला

सुधारित हल्ला

sakal_logo
By

इचलकरंजीत शेजाऱ्यावर
प्राणघातक हल्ला
इचलकरंजी, ता. ३ : भाडेकरूला घर खाली करण्यास सांगण्याच्या कारणावरून जमावाने एकाच्या डोक्यावर फरशीने मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेशकुमार देवकिशन जोशी (वय ६२, रा. महात्मा फुले चौक) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गावभाग पोलिसांत नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात संदीप कांबळे, प्रदीप कांबळे, महेश कांबळे यांच्यासह तिघांच्या पत्नी, त्यांची आई श्रीमती बाळाबाई कांबळे व शेजारी दोन नातेवाईक महिला यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद जखमी संतोषदेवी जोशी यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील महात्मा फुले चौक परिसरात कल्पदीप हॉस्पिटल मागे राजेशकुमार जोशी व संदीप कांबळे हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. काल (ता. २) रात्री दहाच्या सुमारास संदीप याने फोन करून जोशी यांना खाली बोलावून घेतले आणि त्यांच्या भाडेकरूला घर खाली करण्यास सांगितले. यानंतर कांबळे यांच्यासह नऊ जण जोशी यांच्या घरात घुसले. भाडेकरूला घर खाली करण्यास का सांगत नाहीस, असे म्हणून जमावाने जोशी यांना ठार करण्याच्या उद्देशाने कांबळे कुटुंबीयांनी फरशीने त्यांच्या डोक्यात व अंगावर हल्ला केला.
ठार करण्याचा प्रयत्न करीत जिन्यावरून फरफटत खाली आणले. पतीला सोडविण्यास आलेल्या संतोषदेवी यांना बाळाबाई यांनी मारहाण केली; तर प्रदीप कांबळे याने खिडकीची काच फोडून नुकसान केले. हल्ल्यात राजेशकुमार जोशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.