किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा
किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा

किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

ich44.jpg
73327
इचलकरंजी: रोटरी क्लब सेंट्रल आणि ऋणानुबंध शैक्षणिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी कार्यशाळा झाली.
किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा
इचलकरंजी : रोटरी क्लब सेंट्रल आणि ऋणानुबंध शैक्षणिक मंचतर्फे किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा झाली. यात शहर व परिसरातील विविध शाळेतील १९२ विद्यार्थिनी व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यशाळेचे उद्‍घाटन रोटरीचे गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्याहस्ते झाले. प्रथम सत्रात डॉ. आरती कोळी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर संजय रेंदाळकर यांनी निळू फुले क्लबतर्फे शॉर्ट फिल्म दाखवून मुलींशी मुक्त संवाद साधला. स्वभान ते समाजभान या चर्चासत्रात विभावरी नकाते आणि स्नेहल माळी यांनी मुलींच्या प्रश्नाला उत्तरे दिली. मुलींकडून पत्रलेखन करून घेतले. शिवकुमार दड्ड, पन्नालाल डाळ्या, अशोक जैन, श्रीकांत राठी, प्रशांतकुमार कांबळे, घनश्याम सावलानी, सुरेश रोझे, दिलशाद मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन अशोक भुजवडकर, अशोक कोळी, नौशाद शेडबाळे, दीपक होगाडे आदिंनी केले. सूत्रसंचालन देवदत्त कुंभार यांनी केले.
--------
हॉकी स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : पहिल्या महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक हॉकी स्पर्धेसाठी येथील दिग्विजय नाईक यांची संघाच्या स्पर्धा प्रमुख म्हणून निवड झाली आहे. विनोद ढोले यांची पंच म्हणून निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पुरुष संघात प्रथमेश गायकवाड, रोहन माधव, विष्णू देढे या तीन खेळाडूंची निवड झाली. स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस्‌‌ कॉप्लेक्स येथे ५ ते ११ जानेवारीपर्यंत होणार आहेत. खेळाडूंना मनोज इनानी, संजय पोवाडे, उदय मेटे, सुहास पाटील, नितीन डंबाळ, अभिजित कवडे आदींचे मार्गदर्शन लाभले.
-----
आय्याप्पा स्वामींची महापूजा
इचलकरंजी : आय्याप्पा स्वामींची महापूजा उत्साहात झाली. येथील श्री आय्याप्पा स्वामी भक्त मंडळ आणि तुळूनाड मित्र मंडळातर्फे जिव्हाजी सांस्कृतिक भवनमध्ये महापूजेचे आयोजन केले आहे. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशोक गुरुस्वामी, मनीकंठा दर्शन भाग्य ब्रह्मांड, ठाणे, हरीश गुरुस्वामी (भांडुप), प्रभाकर गुरुस्वामी (पुणे), उमेश गुरुस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामींचे विधिवत पूजन केले. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट केली होती. केळीचे झाड आणि केळीच्या साहाय्याने दीपमाळ उभारली होती. दीपमाळवर लावलेल्या पणत्यांनी पूजा घर उजळून निघाले. दाक्षिणात्य वाद्यांचा निनाद श्री आयाप्पा स्वामी यांच्यावरील मंत्रोच्चार आणि आरतीने चैतन्य निर्माण झाले. तत्पूर्वी भजनाचेही आयोजन केले होते. महापूजेस मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावली. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
--------
शाहू हायस्कूलमध्ये व्याख्यान
इचलकरंजी: छत्रपती शाहू हायस्कूल येथे दहावी अभ्यासगट अंतर्गत ''मी सी ए होणारच'' या विषयावर व्याख्यान झाले. माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने हे व्याख्यान झाले. सीए विजय दुधरकर यांनी चार्टेड अकौंटंट होण्याबद्दलची माहिती समजावून सांगितली. सीए असोसिएशनचे अध्यक्ष सीए मुकेश मालानी व सीए दिपक बसूदे, अलका शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघाचे राजू नदाफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिभा लंगोटे हिने आभार मानले.