दुचाकी चोऱ्यांत २६ टक्‍यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोऱ्यांत २६ टक्‍यांनी वाढ
दुचाकी चोऱ्यांत २६ टक्‍यांनी वाढ

दुचाकी चोऱ्यांत २६ टक्‍यांनी वाढ

sakal_logo
By

05336
संग्रहित
---------
दुचाकी चोऱ्यांत २६ टक्‍यांनी वाढ
दररोज एक गाडी चोरीस; नागरिकांमध्ये भीती
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.८ : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. घरासमोर, आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, इमारतींचा पार्किंगमधूनही दुचाकींची चोरी होत आहे. मोकळ्या जागेत वाहन पार्क करताना नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुचाकी चोरीची दररोज एक तक्रार तरी पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. गतवर्षी तब्बल २६ टक्क्यांनी शहरात दुचाकी चोऱ्या वाढल्या असून उकल होण्याचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे.
घराजवळ आणि कार्यालयानजीक वाहने पार्किंगला जागा नसल्यामुळे सर्वसामान्यांकडून मोकळ्या जागेत पार्किंग केले जाते. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून चोरी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवरून वाहनचोरीमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे वाहनचोरी रोखणार तरी कशी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपवाद वगळता चोरटे पोलिसांना सापडलेच नाहीत. चोरटेच सापडत नसल्याने चोरीस गेलेल्या दुचाकींचाही शोध लागत नाही. वर्दळीच्या ठिकाणावरूनही हँडेल लॉक केलेली दुचाकी काही क्षणात गायब केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.
गतवर्षी शहरातून ११३ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येतो. मात्र, वाहन चोरल्यानंतर चोरटे वाहन क्रमाकांची पाटी बदलतात. वाहनाच्या चेसवरील क्रमांक बदलतात. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध घेणे कठीण होते. शहरासह वाढीव भागात नोकरी-व्यवसाय, शिक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिक स्थायिक झाले आहेत. कर्जावर घेतलेले वाहन चोरीला गेल्यानंतर त्याची झळ सामान्यांना सोसावी लागते.
--------
अवैध विक्रीवर हवा वॉच
ग्रामीण भागात कमी किंमतीत जुन्या दुचाकींची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. अनेकदा बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या दुचाकींची विक्री केली जाते. कमी किंमतीत दुचाकी मिळत असल्याने कागदपत्रांशिवायही खरेदी होते. सीमाभागातील चोरट्यांच्या टोळ्याही यात सक्रीय असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. दोन वर्षापूर्वी अशा एका टोळीवर गावभाग पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावर सातत्याने वॉच ठेवल्यास चोरटे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----
चोरट्यांच्या हातचलाखीचे आव्हान
चक्क इमारतीच्या पार्किंग परिसरातून दुचाकी पळवल्या जात आहेत. आपली ओळख पटू नये, यासाठी या चोरटे डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क लावत आहेत. चोरट्यांच्या ही हातचलाखी नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी आहे. चोरांना आळा बसावा म्हणून सीसीटीव्ही लावण्यात आले खरे. पण सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या अशा घटनानंतर आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
-------
ग्राफ करणे
दुचाकी चोरी गुन्हे (वर्ष २०२२)
पोलीस ठाणे*गुन्हे* उकल
शिवाजीनगर* ५५*१७
गावभाग*४१*४
शहापूर*१७*१
एकुण *११३*२२
----------