भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान; जे. टी. पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान; जे. टी. पाटील
भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान; जे. टी. पाटील

भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान; जे. टी. पाटील

sakal_logo
By

05354, 05355
इचलकरंजी : शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी जे. टी. पाटील दुसऱ्या छायाचित्रात दि. न्यू हायस्कूल इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर तयार केलेले मल्टीपर्पज क्लिनिंग मशीनचे उपकरण.

भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान
जे. टी. पाटील; शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटन
इचलकरंजी, ता. १० : भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिकांचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान विषयाची अभिरुची निर्माण व्हावी हा हेतू विज्ञान प्रदर्शनातून सफल होत आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जवळ असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, असे उपक्रम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हातकणंगले जे. टी. पाटील यांनी केले.
इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग, सरस्वती हायस्कूल, गुरुकुल शिक्षण समूह अब्दुल लाट, फाय रिसर्च इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्यातर्फे आयोजित ५० व्या इचलकरंजी शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सरस्वती हायस्कूलमधील कल्पना चावला विज्ञान नगरीमध्ये उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी हा असून दोन दिवसांच्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ७५ पेक्षा जास्त वैज्ञानिक उपकरणाचा समावेश आहे.
रोपाला पाणी घालून तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोट, तोफ व यंत्रमाग (मिनी मॉडेल) उपकरणांच्या माध्यमातून प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे यांनी विद्यार्थ्यांजवळ क्रिएटिव्हिटी आणि जिज्ञासा वृत्ती असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रम बारकाईने अभ्यास करून अधिकाधिक ज्ञान प्राप्त केल्यास सुजनशील विद्यार्थी घडू शकतात, असे सांगितले. प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे, संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने, गुरुकुल शिक्षण समूह अब्दुल लाटचे चेअरमन गणेश नायकुडे, शिवाजीराव जगताप, पृथ्वीराज माने पर्यवेक्षक आर. एन. जाधव, पी. जी. हजगुळकर, मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक पी. डी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शहर विज्ञान समितीचे अध्यक्ष एस. ए. पाटील यांनी आभार मानले. अनुराधा काळे व एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.