Mon, Jan 30, 2023

कारखान्यात चोरी
कारखान्यात चोरी
Published on : 10 January 2023, 6:41 am
यड्रावला दीड लाखांची चोरी
इचलकरंजी, ता.१० : यड्राव (ता. शिरोळ) येथे पार्वती इंडस्ट्रीजमधील बंद कारखान्यातून १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली. बनवारीलाल नवरंगराय पोद्दार (वय ५४ रा. इचलकरंजी) यांचा पार्वती इंडस्ट्रीजमध्ये सेव्हन स्टार केमप्लास्ट नावाचा कारखाना आहे. कारखान्यात लोखंडी एनग्रेव्हड प्रिंटीग सिलेंडर तयार केले जातात. काही दिवसांपासून कारखाना बंद होता. याचा फायदा उठवत चोरट्याने कारखान्याचे कुलुप व कडीकोयंडा उचकटुन १ लाख ६२ हजार ५०० रुपये किंमतीचे ६५ नग लोखंडी एनग्रेव्हड प्रिंटीग सिलेंडर चोरुन नेले. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.