
सक्षम, सुजाण विद्यार्थी हीच राष्ट्राची खरी संपत्ती
ich2213.jpg
77588
इचलकरंजी : गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात खासदार धैर्यशील माने यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला.
-----------
सक्षम, सुजाण विद्यार्थी हीच राष्ट्राची खरी संपत्ती
खासदार धैर्यशील माने; गोविंदराव हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
इचलकरंजी, ता. २३ : इतिहास अभ्यासून स्पर्धात्मक युगात नियोजनपूर्वक भविष्याची बांधणी करीत आपले ध्येय गाठा. क्षणिक गोष्टींनी विचलीत होऊ नका. सक्षम व सुजाण विद्यार्थी हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
ज्ञानसेवेची शतकोत्तर राप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या व इचलकरंजीची मातृसंस्था असलेल्या गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ९६ व्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कृष्णाजी बोहरा होते. प्रमुख पाहुण्यांना एनसीसी चीफ ऑफिसर सी. पी. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी पथकाने मानवंदना दिली. शालेय गीतमंचच्या विद्यार्थिनींनी आर. आर. कांबळे व एस. आय. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले.
प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते राष्ट्रीय, राज्य पातळीवर यशस्वी व क्रीडामहोत्सवात विजयी झालेल्या खेळाडूंना सन्मानीत केले. क्रीडा अहवालाचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी शुभम केशरवाणी याने केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एस. चिंचवाडे यांनी केले. विकास कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे सचिव बाबासाहेब वर्डिगे, स्कूल कमिटी चेअरमन लक्ष्मीकांत पटेल, विश्वस्त मारुती निमणकर, अहमद मुजावर, महेश बांदवलकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एच. कवठे, उपप्राचार्य श्री. आर. जी. झपाटे, पर्यवेक्षक श्री. एस. एस. तेली आदी उपस्थित होते. आभार उपप्राचार्य आर. जी. झपाटे यांनी मानले. सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले.