अशोक हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक हायस्कूलचे यश
अशोक हायस्कूलचे यश

अशोक हायस्कूलचे यश

sakal_logo
By

ich233.jpg
77639
इचलकरंजी : इंटरमिजिएट परीक्षेतील अशोक हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.

अशोक हायस्कूलचे यश
इचलकरंजी : येथील अशोक हायस्कूलचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक माजी आमदार अशोक जांभळे, मुख्याध्यापिका सौ. एस. डी. पाटील, कलाशिक्षक एस. ए. बुगटे यांचे मार्गदर्शन लाभले.
------
ich234.jpg
77640
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भित्तीपत्रिका उद्‌घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल पाटील आदी उपस्थित होते.

‘डीकेएएससी’मध्ये भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये इतिहास विभागातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व भित्तीपत्रिकेचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. भित्तीपत्रिकेत दत्ताजीराव कदम, स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन वृत्तांत यांचा समावेश होता. निकिता हुबळी, ओंकार बेलेकर, सोहेब आरकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. अरुण कटकोळे यांनी केले. आभार प्रा. विशाल गोडबोले यांनी मानले. डॉ. डी. सी. कांबळे, डॉ. सौ. वेल्हाळ, डॉ. उबाळे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. भारती कोळेकर आदी उपस्थित होते.
-------
ich235.jpg
77641

इचलकरंजी : विनायक विद्यालय व विशाल विद्यालय यांचा संयुक्त पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला.

विशाल विद्यालयात पारितोषिक वितरण
इचलकरंजी : विनायक विद्यालय व विशाल विद्यालय यांचा संयुक्त पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला. राज्य कर निरीक्षक विकास भोसले, सचिन गुरनांनी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे सचिव अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. विद्यालयात देणगीदारांच्या माध्यमातून बांधलेल्या दोन खोल्यांचे उद्‍घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. शासकीय व शाळाअंतर्गत स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. प्रास्ताविक मुख्याध्यापक किरण कोळी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक संदीप संकपाळ यांनी करून दिला. स्वागत संचालक आकाराम सावंत यांनी केले. आभार मुख्याध्यापक अशोक हुबळे यांनी मानले. सूत्रसंचालन सुरेखा कदम, सुवेगा मगदूम यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
--------
कन्या महाविद्यालयात विवेकानंद जयंती
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात विवेकानंद जयंतीचा सप्ताह साजरा झाला. या सप्ताहाची सांगता ‘भारतीय संविधान आणि महिला’ या विषयावरील सुरेश सावंत यांच्या व्याख्यानाने झाली. भारतीय संविधानाने स्त्रियांना अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत, पण त्याची योग्य ती जाणीव त्यांना नाही. त्यामुळे आज घरोघरी संविधानाचा जागर करणे महत्त्वाचे आहे. खरे तर अगदी प्राचीन काळापासूनच स्त्रियांनी केलेली शेतीची प्रगती आणि मानवी विकासात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा. संगीता पाटील होत्या. सुनील स्वामी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख रोहित दळवी यांनी केली. सूत्रसंचालन रामेश्वरी कुदळे यांनी केले. डॉ. धीरज शिंदे यांनी आभार मानले.
-----------
लिंगायत वधू-वर मेळावा
इचलकरंजी : इचलकरंजी लिंगायत तेली समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. समाजाचा हा राज्यपातळीवरील यंदाचा बारावा वधू-वर पालक परिचय मेळावा आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी नऊ ते पाच या वेळेत हा मेळावा श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा केली आहे. मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद गजरे, महादेव विभुते यांनी केले आहे.
-----
‘व्यंकटराव’मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : व्यंकटराव हायस्कूलमध्ये विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. शासनातर्फे घेतलेली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा, सरस्वती सोशल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, तसेच वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे घेतलेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ढवळे, उपाध्यक्ष दीपक राशिनकर आदींच्या हस्ते सत्कार झाला. मुख्याध्यापक ए. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव श्री. इंगळे, उपमुख्याध्यापिका सौ. अश्विनी कांबळे, पर्यवेक्षक श्री. खराडे आदी उपस्थित होते.