
भैरवनाथ नर्सिंग स्कूलमध्ये परिचर्या शपथविधी
05510
कोरोची : भैरवनाथ नर्सिंग स्कूलमध्ये आयोजित परिचर्या शपथविधी सोहळ्यात नर्सिंग विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
----------
भैरवनाथ नर्सिंग स्कूलमध्ये परिचर्या शपथविधी
इचलकरंजी : रुग्णसेवेत नर्सेसचे स्थान महत्त्वाचे आहे. या रुग्णसेवेचा समाजाला अभिमान आहे, असे मत भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. श्री भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था कोरोची स्कूलमध्ये आयोजित परिचर्या शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोरोचीचे सरपंच डॉ. संतोष भोरे होते. शहापूरचे पोलिस निरीक्षक डी. ए. माळी, ग्रामसेवक राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य विकी माने, कोमल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेकडो विद्यार्थी या संस्थेमधून उत्तीर्ण होऊन कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध हॉस्पिटल्समध्ये रुग्णसेवा देत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील यांनी सांगितले. व्यवस्थापक अनिकेत कांबळे, नर्सिंग प्राचार्य सनी आवळे, परावैद्यक मंडळ प्राचार्या वैशाली पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवले. सूत्रसंचालन किशोर निकम यांनी केले.