ऊस तोडणी वाहतूकदारांचा उद्या मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस तोडणी वाहतूकदारांचा उद्या मेळावा
ऊस तोडणी वाहतूकदारांचा उद्या मेळावा

ऊस तोडणी वाहतूकदारांचा उद्या मेळावा

sakal_logo
By

ऊस तोडणी वाहतूकदारांचा उद्या मेळावा
इचलकरंजी, ता.२४ : स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदारांचा पंचगंगा साखर कारखाना कार्यस्थळावर भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवारी(ता. २६) सकाळी अकरा वाजता कारखाना इंटक भवन येथे मेळावा होणार आहे. मेळावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पृथ्वीराज पवार, कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
राज्यात एकूण साखर उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. या क्षेत्रात शेतकऱ्याचा ऊस तोडून तो कारखान्यापर्यंत पोहोच करण्याचे काम ऊस वाहतूकदारांच्या माध्यमातून होत आहे. मात्र अनेक वर्षापासून ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक, त्यातून मजुरांबाबत होणारे खोटे गुन्हे, आत्मघाती हल्ले होत आहेत. या व्यवसायातील फसवणुकीमुळे कर्जबाजारी होऊन ऊस वाहतूकदार आत्महत्या करत आहेत. अशा या असंघटित शोषित ऊस वाहतूकदारांना एकत्रित करून स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा उभा केला जाणार आहे. मेळाव्यानिमित्त ऊस वाहतूकदारांचे प्रश्न, अडचणी, भविष्यातील लढा उभा करण्याकरता चर्चा विनीमय होणार आहे. मेळाव्यास ऊस तोडणी वाहतूकदांरानी उपस्थित रहावे, असे आवाहन ऊस वाहतूक संघटनेच्या सुकाणू समितीतर्फ केले आहे.