इचलकरंजीत जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

इचलकरंजीत जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

05689
इचलकरंजी ः लायन्स क्लब येथे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले.
-------------
इचलकरंजीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
इचलकरंजी, ता. २४ : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लब येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. लायन्स क्लब व केन चेस ॲकॅडमीमार्फत स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ५० शाळांतील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त १३ खेळाडूंचाही सहभाग होता. एकूण ८ फेऱ्या घेण्यात आल्या.
स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच सौ. आरती मोदी, करण परिट, राज्य पंच रोहित पोळ, विजय सलगर, सहाय्यक पंच सौ. आस्मिता नलवडे, संदीप चव्हाण, प्रतिमा चंदनशिवे, संदीप पंडित, अमृत तावरे, इंद्रजित कर्वे यांनी काम पाहिले. उद्‍घाटन व पारितोषिक वितरण लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, लेडीज विंग चेअरमन कनकश्री भट्टड, कांता बालर, रचना बगाडिया, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
अनुक्रमे निकाल असा- १६ वर्षांखालील : दिव्या पाटील, रियार्थ पोदार, शौर्य बगडिया, शंतनू पाटील, व्यंकटेश खाडेपाटील. १० वर्षांखालील ः प्रेम निचल, अर्णव पाटील, वेदान बांगड, सिद्धी कर्व, आदित्य घाटे. ९ वर्षांखालील मुले ः अलंकार तेली, द्विज कातृत, राघव भुतडा. मुली ः प्रगती बंग, सांची चौधरी, स्वरा पाटणी. उत्कृष्ट ११ वर्षांखालील मुले ः अभय भोसले, विवान सोनी, वरद पाटील. मुली ः सिद्धी बुबने, अनिका खंडेलवाल, आराध्या ऋग्गे. उत्कृष्ट १३ वर्षांखालील मुले ः वेदांत पुजारी, अथर्व तावरे, तरुण गिरमल. मुली ः अरिणा मोदी, संस्कृती सुतार, प्रियदर्शनी ठोमके. उत्कृष्ट स्पोर्टसमनशिप सन्मानचिन्ह - आरव पाटील, उत्कृष्ट वार्षिक बुद्धिबळ खेळाडू - शौर्य बगडीया व अथर्व तावरे.
उत्कृष्ट बुद्धिबळ शाळा - अल्फोन्सा स्कूल (यड्राव), पोदार इंटरनॅशनल स्कूल (यड्राव), बालाजी विद्यामंदिर, इचलकरंजी, डीकेटीई नारायण मळा, प्राथमिक विद्यामंदिर, चंद्रनारायण बलदवा इंग्लिश मेडियम स्कूल (जयसिंगपूर), मॉडर्न स्कूल, इचलकरंजी. गंगामाई विद्या मंदिर, समर्थ विद्या मंदिर, मारवल इंग्लिश मेडियम स्कूल, इचलकरंजी, कन्या विद्यामंदिर (नांदणी).
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com