तेलनाडेसह गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेलनाडेसह गुन्हा दाखल
तेलनाडेसह गुन्हा दाखल

तेलनाडेसह गुन्हा दाखल

sakal_logo
By

संजय तेलनाडेसह १८ जणांवर गुन्हा
इचलकरंजी, ता. १ : डबल मोका कारवाईतून जामिनावर बाहेर आलेला माजी नगरसेवक संजय शंकर तेलनाडेसह १८ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे जमाव करीत रस्त्यावर येण्या-जाण्यास प्रतिबंध करून अटकाव केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी दिली.
शहरातील गावभागातील पाणी समस्या तसेच नियमित गटारी व रस्ते स्वच्छता होत नाही. याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही सुधारणा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला. पोटफाडी चौकात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी बेकायदेशीर जमाव केला आणि येण्या-जाण्यास प्रतिबंध करून वाहनधारक, नागरिकांना अटकाव केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. या प्रकरणी माजी नगरसेवक संजय तेलनाडे, स्मिता तेलनाडे, विजय रवंदे, संभाजी निगडे, इम्रान कलावंत, वृषभ पाटील, युवराज पाटील, राजू तारदाळे, कुमार बेडक्याळे, अनुप सिद्धनाळे, दीपक कोरे, संदेश कापसे, राकेश कुंभार, समर पाटील, भूषण शेटे, प्रताप मुदगल, अमिर मुजावर आणि गौरव लवटे (सर्व रा. इचलकरंजी) या १८ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.