राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाचे वर्चस्व
राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाचे वर्चस्व

राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाचे वर्चस्व

sakal_logo
By

05739
इचलकरंजी : राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार डीकेएएससी महाविद्यालयातर्फे करण्यात आला.
--------
राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाचे वर्चस्व
विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक दिंडी, आदिवासी लोकनृत्यात देशात ठरले भारी
इचलकरंजी, ता. ३ : विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत येथील दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे चार विद्यार्थी देशात भारी ठरले आहेत. स्पर्धेत सांस्कृतिक दिंडी, आदिवासी लोकनृत्य कलाप्रकारात या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. विद्यापीठासह राष्ट्रीय स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाने वर्चस्व ठेवले. अखिल भारतीय विश्वविद्यालय या राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धा जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर (कर्नाटक) येथे झाल्या.
विद्यापीठाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाचा नेहमी अग्रेसर सहभाग असतो. बेंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव सांस्कृतिक स्पर्धेत महाविद्यालयाचे महेश गवंडी, तुषार पाटील, स्वप्नील जंत्रे, यशराज पाटणकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यापूर्वी विद्यार्थ्यांनी गणपत युनिव्हर्सिटी, गुजरात येथे झालेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, मूकनाट्य, लोकसंगीत वाद्यवृंद, एकांकिका, लघुनाटिका आदी कलाप्रकारात सहभाग नोंदवून यश संपादन केले होते. विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवा महोत्सवामधील स्पर्धांसाठी विद्यापीठ संघात निवड झाली होती.
बेंगलोर येथे सांस्कृतिक दिंडी, आदिवासी लोकनृत्य कलाप्रकारात त्यांनी विद्यापीठ संघाला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. लोकसंगीत वाद्यवृंदमध्ये कास्यपदक मिळवले. महाविद्यालयासह शहराच्या सांस्कृतिक परंपरेला ही बाब अभिमानास्पद अशी आहे. विद्यार्थ्यांचा अतुलनीय कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. डी. सी. कांबळे, सदस्या डॉ. सुनिता वेल्हाळ, डॉ. पद्मश्री वाघमारे, डॉ. अर्जुन जाधव, डॉ. रिता रॉड्रिक्स यांचे मार्गदर्शन लाभले.