बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या पाटील प्रथम

बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या पाटील प्रथम

ich142. jpg
88992
इचलकरंजी : लायन्स क्लब आयोजीत महिला बुध्दिबळ स्पर्धतील विजेते खेळाडू.
--------------------------
बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या पाटील प्रथम
इचलकरंजीत लायन्स क्लबतर्फे आयोजन; ६७ स्पर्धक सहभागी
इचलकरंजी, ता. १४ : लायन्स क्लब येथे खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने, लायन्स क्लब व केन चेस अकॅडमी यांच्यामार्फत आयोजित स्पर्धेत ६७ स्पर्धक सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त दहा खेळाडूंचा सहभाग लक्षवेधी होता.
स्पर्धेत प्रथम दिव्या पाटील, द्वितीय ईश्वरी जगदाळे, तृतीय संस्कृती सुतार तर सारा हरोळे, अनुष्का पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेतल्या. स्पर्धेसाठी राज्य पंच रोहित पोळ, विजय सलगर, सहाय्यक पंच संदिप चव्हाण, इंद्रजित कर्वे यांनी काम पाहिले. उद्‍घाटन व बक्षिस समारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, विजय राठी, कनकश्री भट्टड, कांता बालर, संगिता सारडा, स्वाती राठी, रेखा मंत्री, वंदना भांगडीया, कृष्णा भराडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कर्नाटक, सांगली, कोल्हापूर, नांदणी, जयसिंगपूर भागातील महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत उत्कृष्ट आई, कन्या स्पर्धक पुरस्कार हा ईश्वरी जगदाळे, शिल्पा जगदाळे यांना मिळाला. उत्कृष्ट वार्षिक बुद्धिबळ खेळाडूंचा किताब युक्ता कांबळे हिला दिला. उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून तृप्ती प्रभू, शिल्पा जगदाळे, श्रुती कुलकर्णी, दिशा पाटील, पूनम चांडक, अस्मिता नलवडे यांना गौरवले.
अन्य अनुक्रमे निकाल असा -
आठ वर्षाखालील मुली- प्रगती बंग, अन्वेशा सोनी, सांची चौधरी, क्रिशा बाहेती, रिद्धी भुतडा.
११ वर्षांखालील मुली - तन्मयी पवळे, सिद्धी बुबने, सिद्धी कर्व, आर्या माने, रांशू कुलकर्णी.
१४ वर्षांखालील (इचलकरंजी) मुली - पलक मिश्रा, प्रियदर्शनी ठोमके, अनिका खंडेलवाल, धवनी पाटणी, हर्षिता काबरा.
१४ वर्षाखालील(परिसर) मुली - महिमा शिर्के, दिशा पाटील, श्रद्धा पाटील, मृणाल गोसावी, सई बुबणे.
----------
एकाचवेळी आठ जणांशी खेळ
स्पर्धेत राष्ट्रीय महिला खेळाडूंनी अनोख्या खेळाचे प्रदर्शन घडवले. यावेळी एका खेळाडूने एकाचवेळी तब्बल आठ जणांशी खेळ दाखवला. यामध्ये राष्ट्रीय खेळाडूसह दिव्या पाटील, दिशा पाटील, ईश्वरी जगदाळे, महिमा शिर्के, संस्कृती सुतार आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com