बोंब मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोंब मारो आंदोलन
बोंब मारो आंदोलन

बोंब मारो आंदोलन

sakal_logo
By

05874
इचलकरंजीत शिक्षकांचे बोंब मारो आंदोलन
इचलकरंजी : जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेला सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरूच राहिला. पाचव्या दिवशी विविध शिक्षक
संघटनांच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून मंगळवार (ता. १४) पासून बेमुदत संप सुरू आहे. या संपातून महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी उर्वरित शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. संपातील सहभागी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रांत कार्यालयासमोर दररोज सकाळी ११ वाजता निदर्शने करतात. शनिवारी सकाळी शिक्षक संघटनांनी एकत्र येत बोंब मारो आंदोलन करून निदर्शने केली. यावेळी शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते