
‘डीकेएएससी’मध्ये अवकाश दर्शन
05937
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात अवकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला.
‘डीकेएएससी’मध्ये अवकाश दर्शन
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी अवकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला. काल (ता. २८) सूर्यास्तानंतर अवकाशात एकाचवेळी पाच ग्रह पाहायला मिळण्याची अत्यंत दुर्मिळ अवकाशीय घटना ही पर्वणी उपलब्ध झाली. बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस हे चंद्राभोवती धनुष्याकृती रेषेत आकाशात एकाच वेळी पाहण्याची ही संधी विद्यार्थ्यांनी अनुभवली. सूर्यास्तानंतर सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी भौतिकशास्त्र विभागाकडील प्रा. सूरज पठाण यांचे तांत्रिक सहाय्य मिळाले. डॉ. अतिश पाटील, प्रा. सचिन जाधव, डॉ. नवनाथ नाईकनवरे, प्रा. अक्षय स्वामी, प्रा. अवधूत ढोकरे, प्रा. सौरभ मोरे, प्रकाश गिरी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील व भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. सी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
----
05938
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे औद्योगिक क्षेत्र भेट झाली.
कन्या महाविद्यालयातर्फे औद्योगिक क्षेत्रभेट
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची तिळवणी येथे औद्योगिक क्षेत्रभेट झाली. खर्च, प्राप्ती, किंमत, निर्धारण आदी अभ्यासक्रम प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्राला भेट देऊन समजून घेतला. त्रिशला एंटरप्राईजेसचे व्यवस्थापकीय संचालक नोबेल कांबळे यांनी विद्यार्थिनींना उत्पादन प्रक्रिया, गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्र भेटीसाठी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. संपदा टिपकुर्ले, प्रा. स्वप्निल वाकडे, प्रा. स्नेहल पोवार आदी उपस्थित होते.
----
सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉय पॅन मशीन भेट
इचलकरंजी : इनरव्हील क्लबकडून व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉय पॅन मशीन दिले. इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षा मनाली मुनोत यांनी विद्यार्थिनींना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षा स्नेहा मराठे यांनी मशीन वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. मुग्धा शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते. आर. व्ही. परीट यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. कुंडले यांनी आभार मानले.
----
श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रम
इचलकरंजी : येथील सातपुते गल्लीमधील राम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्ताने विविध कार्यक्रम झाले. सातपुते गल्ली येथे मागील पाच दशकांपासून श्रीरामनवमी जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अखंड सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा उत्सवाचे ५१ वे वर्ष असून नऊ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये कीर्तन, भजन व व्याख्यान, तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर असे कार्यक्रम होणार आहेत. उद्या (ता. ३०) दुपारी १२ ला श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन कडोलकर महाराज यांच्या उपस्थितीत होईल. सायंकाळी साडेपाचला प्रभू श्रीरामाची नगर दिंडी मिरवणूक निघणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ११ ते २ काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांनी केले आहे.
------
कन्या महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी व्याकरणावरील ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषय आणि व्याकरणाला असलेले महत्त्व अधोरेखित करणे, इंग्रजी व्याकरणाची भीती दूर करून इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेत साक्षी पवार हिने प्रथम, आलिशा बागवान हिने द्वितीय, तर साक्षी कागले आणि सानिका पोवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांचा मार्गदर्शनातून ही स्पर्धा झाली. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. दीपक सरनोबत, प्रा. संदीप पाटील प्रा. रामेश्वरी कुदळे, प्रा. सुनीता पोवार आदींनी प्रश्नमंजूषा स्पर्धा यशस्वीरीत्या झाली.
----