सौर प्रकल्प ऐच्छिक; वीज सवलती सुरूच

सौर प्रकल्प ऐच्छिक;
वीज सवलती सुरूच
Published on

12302
मुंबई ः यंत्रमाग उद्योगप्रश्नी येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत सहभागी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, रवींद्र माने, विनय महाजन आदी.

सौर प्रकल्प ऐच्छिक;
वीज सवलती सुरूच
चंद्रकांत पाटील; वस्त्रोद्योगाला दिलासा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २७ ः वस्त्रोद्योगातील घटकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प सक्तीचा असणार नाही. यंत्रमाग उद्योगांसाठीची वीज सवलत बंद केली जाणार नाही, असे मुंबईत आज झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. नवीन वस्त्रोद्योग धोरण आणि यंत्रमाग उद्योगाचे प्रलंबित प्रश्न यावर बैठकीत चर्चा झाली. नव्या वस्त्रोद्योग धोरणांतील त्रुटी दूर करण्यासह सवलती देण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
नव्या धोरणात साध्या यंत्रमागांना स्थान नाही. त्यामुळे या घटकांमध्ये नाराजीचा सूर होता. यासंदर्भातील चर्चेनंतर साध्या यंत्रमागांना लाभ देण्याचा विचार करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. नव्या धोरणात सौरऊर्जेवर भर आहे. त्याचवेळी दोन वर्षांनंतर वीज सवलत बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्याला विरोध करीत वीज सवलत पुढे सुरू ठेवण्याची मागणी यंत्रमागधारक प्रतिनिधींनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी सौर प्रकल्प सक्तीचा नसून वीज सवलत पुढे सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
यापूर्वी २७ अश्वशक्ती खालील यंत्रमागधारकांना एक रुपये आणि त्यावरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे अतिरिक्त सवलत जाहीर आहे; मात्र त्याची अंमलबजावणी नाही. याकडे मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले. दोन्ही सवलती देण्याबाबत त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली. दोन महिन्यांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीवरील व्याज आकारणी रद्द करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मल्टीपार्टी वीज कनेक्शन महावितरणने बंद केले आहे. त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. त्यावर पाटील यांनी तसे कनेक्शन देण्याची कार्यवाही करू, असे सांगितले.
खर्चीवाल्या साध्या यंत्रमागधारकांना जॉबवर्कने राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत १० पैसे प्रतिपीक प्रतिमीटर या दराने बिम पुरवठा व्हावा, यावर शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना यावेळी पाटील यांनी केली. नव्या धोरणात भांडवली अनुदान देताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केल्याची भावना व्यक्त झाली. त्यावर पाटील यांनी ठोस निर्णय जाहीर केला नाही. बैठकीतील विविध निर्णयांना मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चर्चेत आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश चौगुले (भिवंडी), आमदार विजय देशमुख (सोलापूर), आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल (मालेगाव), माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्रसिंह, अव्वर सचिव विशाल मदने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, प्रताप होगाडे, किरण तारळेकर (विटा), शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राजगोंडा पाटील, विनय महाजन, चंद्रकांत पाटील, सतीश कोष्टी, रफिक खानापुरे, पेट्टाण्णा गड्डम (सोलापूर), विश्‍वनाथ मेटे, सुनील तोडकर आदींनी भाग घेतला.

जनआरोग्य योजनेचा लाभ देणार
यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली; मात्र याबाबत मंत्री पाटील यांनी ठोस भाष्य करणे टाळले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ यंत्रमाग कामगारांचा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com