‘रोटरी’ पदाधिकारी पदग्रहण सोहळा

‘रोटरी’ पदाधिकारी पदग्रहण सोहळा

Published on

‘रोटरी’ पदाधिकारी पदग्रहण सोहळा
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल सिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र जैन, तर सचिवपदी हेमंत दोशी यांची निवड झाली. त्यांचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांच्या उपस्थितीत झाला. मावळत्या अध्यक्षा दीप्ती मराठे यांनी कार्याचा आढावा घेतला. सचिव प्रकाश लाहोटी यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नव्या कार्यकारिणीत नीनू लंबा, प्रकाश लाहोटी, आरती मंगलानी, सुमित लाहोटी, सतीश राठी, ऋषभ जैन, शैली जैन, राजेश सुराणा आदींचा समावेश आहे. प्रशांत कांबळे, पन्नालाल डाळ्या, रवी अडूकिया, राजेश कोडुलकर आदी उपस्थित होते. ओम पाटणी व सुमन पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत दोशी यांनी आभार मानले.
----
विनाडोनेशन प्रवेशाची मनसेची मागणी
इचलकरंजी : अकरावीचे प्रवेश हे विनाडोनेशन व्हावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे केली आहे. वारेमाप फी आकारून प्रवेशाचा प्रकार निदर्शनास आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व कॉलेजला दिला आहे. मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयासह शहरातील कॉलेजात दिले. रोहित कोटकर, ऋषिकेश पाटील, योगेश दाभोळकर, संग्राम पोरे, गौतम नवले, उदय मस्के, प्रथमेश मस्के आदी उपस्थित होते.
----
‘रोटरी’तर्फे दिव्यांगांसाठी शिबिर
इचलकरंजी : रोटरी परिवारातर्फे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात शिबिर झाले. अग्रेसन सेवा ट्रस्ट, मारवाडी युवा मंचतर्फे व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने हे शिबिर ६ ऑगस्टला होणार आहे. अग्रसेन भवन येथे होणाऱ्या शिबिराचा पश्चिम महाराष्ट्रसह उत्तर कर्नाटकमधील दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिबिरादिवशी पायाची व हाताची मापे घेतली जाणार असून त्यानंतर महिनाभरात अवयवांचे वितरण केले जातील, अशी माहिती प्रोजेक्ट कमिटी चेअरमन पन्नालाल डाळ्या यांनी दिली.
----
इचलकरंजीत हॅप्पीनेस प्रोग्रॅम
इचलकरंजी : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हॅप्पीनेस प्रोग्रॅमचे आयोजन केले आहे. ११ ते १६ दरम्यान शिबिर सकाळी सहा ते नऊ या वेळेत ईस्ट मँचेस्टर, सांगली रोड, यड्राव येथे होणार आहे. शिबिरात प्राणायाम, योगासन, ध्यान तसेच सुदर्शन क्रिया याचे मार्गदर्शन सचिन पाटील व अमोल लोहार करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.