पोलिसांच्या संवादावरच वाहतुकीला शिस्त

पोलिसांच्या संवादावरच वाहतुकीला शिस्त

Published on

06676
राजीव पाटील
---------
पोलिसांच्या संवादावरच वाहतुकीला शिस्त
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील; तक्रारींकडे उपाययोजना म्हणून पाहणार
इचलकरंजी, ता.१० : वाहतुकीला खरी शिस्त वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या संवादावर अवलंबून असते. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नागरिकांबरोबर सौजन्यानेच वागण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. येणाऱ्या तक्रारीकडे तक्रार म्हणून न पाहता उपायोजना म्हणून पाहून वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, शहर वाहतूक शाखेचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील यांनी सांगितले.
इचलकरंजी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसुळ यांची कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाणे येथे बदली झाली. त्यांच्या जागी मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील यांची नियुक्ती झाली. शहर वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
शहरातील वाहतूकीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नेमुन दिलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्‍यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, नागरिकांशी सौजन्याची वर्तणुक ठेवावी याकडे विशेष लक्ष देणार आहे. शहरातील वाहतुकीची पाहणी केली असता वाहतुक आराखड्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. येत्या काही दिवसांत वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणार आहे. तसेच सेफ सिटी योजनेतून मुख्य मार्गासह मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचा गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच वाहतुक पोलिसांनाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी मदत होत असते. मात्र २४८ पैकी बहुतांश कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे क्रेनच्या मदतीने शहरातील सीसीटीव्हींची देखभाल आणि डागडुजी करून सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यावर भर दिला जाईल."
वाहतुकीला अडथळा ठरणारे छोटे व्यापारी, अतिक्रमणधारकांवरही कारवाईसाठी महापालिका आणि वाहतुक शाखेच्यावतीने संयुक्त मोहिम सुरु करणार आहे. नो पार्किंगबाबत अधिक काळजी घेवून वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.
----------
वाहतूक शाखेपुढील आव्हाने
* शाळा सुटल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी
* मुख्य मार्गावरील अवजड वाहतूक
* सुसाट दुचाकीच्या वेगावर नियंत्रण
* सिग्नल चौकात सक्षम व्यवस्था
* पार्किंगच्या प्रश्नावर उपाययोजना
* विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.