सर्पदंश मुलाचा मृत्यू

सर्पदंश मुलाचा मृत्यू

Published on

06682
मृत ओंकार शिंदे
...

इचलकरंजीत सर्पदंशामुळे
शाळकरी मुलाचा मृत्यू
इचलकरंजी, ता.१० : येथे नागाच्या दंशामुळे दहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ओंकार संदीप शिंदे (वय १०) असे त्याचे नाव आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. दुरवस्था झालेल्या गटारीमधून आलेल्या नागाने ओंकारला दंश केला. ओंकारच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर दंश केलेला हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून हा नाग पाच फूट लांबीचा होता.
कारंडे मळा साईनगर गल्ली नंबर ३ मध्ये मंगळवारी (ता.४ ) सायंकाळी सहा वाजता ओंकार घरासमोर खेळत होता. खेळता खेळता चेंडू गटारीमध्ये गेला. यावेळी हा चेंडू काढत असताना अचानक त्याला नागाने दंश केला. भागातील नागरिकांनी उपचारासाठी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराची सुविधा नसल्याने त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवले. पुढील उपचारासाठी पुन्हा सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.