पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करा

पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करा

ich113.jpg
15472
इचलकरंजी : पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करावे, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले.

पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मागणी; २४ जुलैला रास्ता रोकोचा इशारा
इचलकरंजी, ता. ११ : शहरातील शेती मार्गावरील पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करून ते सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे व प्रांताधिकारी मोसमी चौगुले-बर्डे यांना देण्यात आले. येत्या १४ दिवसांत याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर २४ जुलैला सकाळी अकरा वाजता नदिवेस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला.
शहरातील जुना हुपरी रोड, टाकवडे रोड या ठिकाणी पाणंद रस्ते तीस वर्षांपासून केलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरून येणारे शेतकरी जखमी होत असून जनावरेही दुखापतग्रस्त होत आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतीकामे करणे कठीण झाले आहे. जनावरांना चारा आणणे, शेतीमाल शहरात आणणे, शेती मशागतीच्या कामांसह शेतीपंप सुरू करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणंद व रस्ते दुरुस्तीबाबत यापूर्वी निवेदन देऊन जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. तरीदेखील याकडे दुर्लक्ष केले गेले. शेतकरी शहरातील स्थायिक असून महानगरपालिकेचा कर भरला जातो. तरीही सुविधा देण्यास टाळाटाळ होत आहे.
शेती रस्त्यावर सांडपाणी येत असून जमीन पाण्याने बाधित होत चालली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन म्हणून या मागणीवर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे अन्यथा २४ जुलैला सकाळी रास्ता रोको आंदोलन करू, असे उपस्थित शेतकऱ्यांनी आयुक्त, प्रांताधिकारी यांना सांगितले. सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापूरे, बसगोंडा बिरादार, राजू चव्हाण, आप्पा कलागते, बाबुराव माळी, नंदकुमार वाडेकर, राहुल लंगोटे, बाबुराव मोकाशी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com