शिष्यवृत्ती निकालात इचलकरंजीची घसरण

शिष्यवृत्ती निकालात इचलकरंजीची घसरण

संग्रहित
-----------
शिष्यवृत्ती निकालात इचलकरंजीची घसरण
९० विद्यार्थी गुणवत्ता यादीत; गतवर्षीच्या तुलनेत १२ ने घट
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ : शिष्यवृत्ती निकालात एक पाऊल पुढे टाकणाऱ्या इचलकरंजी शहराचा यंदा मात्र निकाल काही पावले मागे आला आहे. पाचवी व आठवीतील एकूण ९० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या गुणवत्ता यादीत १२ ने घट झाल्याचे समोर आले.
राज्य गुणवत्ता यादीतील स्थान आणि गुणवत्ता यादीतील शाळांची संख्या टिकून आहे.
कोरोनामुळे बदलत्या आणि विस्कळीत परीक्षांच्या नियोजनात विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी शाळांनी मोठी धडपड केली. दोन वर्षे पाहिली तर २०२१ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म, २०२२ मध्ये परीक्षा आणि निकाल २०२३ मध्ये लागला आहे. याबाबत उदासीनता वाढत असतानाही निकाल प्रभावी लागले. यामुळे गुणवत्ता यादीतील इचलकरंजी शहराचे स्थान बळकट झाले. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत झाली आणि आता निकालही वेळेत लागला आहे. मात्र यंदाच्या निकालाने शिष्यवृत्ती परीक्षेतील शहराची निकालाची परंपरा खंडित झाली. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. पाचवीचे ३४, तर आठवीचे ५६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. यावर्षी कट ऑफ मध्येही चांगलीच वाढ झाली आहे. पाचवीचा कट ऑफ ७८.६६ टक्के, तर आठवीचा ६९.३३ टक्के लागला. यामध्ये पाचवीचा कट ऑफ पाच टक्क्यांनी, तर आठवीचा बारा टक्क्यांनी वाढला आहे. मागीलवर्षी कट ऑफ आणि निकालही चांगला होता. यावर्षी कट ऑफ चांगला आहे. मात्र निकाल चांगलाच घसरला आहे. राज्य गुणवत्ता यादीतील संख्या सहावर पोहोचली आहे. हे यंदाचे चित्र गतवर्षीच्या उलट झाले आहे. यामध्ये मागील वर्षी पाचवीतील पाच, तर आठवीतील एकच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावर्षी पाचवीतील एक आणि आठवीतील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षीचा आकडा टिकवत गुणवत्ता यादीतील शाळांची संख्या २४ आहे.
- - - - - - - - - -
संख्या वाढतेय, गुणवत्ता घसरतेय
मागील तीन वर्षांचा आलेख पाहिला पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहभागी होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही कमालीने वाढत आहे. एकीकडे विद्यार्थी व शाळांची संख्या वाढत असताना घसरणारी गुणवत्ता चिंतनीय आहे. यापुढे विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता शाळांनी गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- - - - - - -
तुलनात्मक शिष्यवृत्ती निकाल (पाचवी व आठवी)
वर्ष*सहभागी शाळा* विद्यार्थी* गुणवत्ताधारक*
२०२१*१०७*१२६५*१०१
२०२२*१११*१५९१*१०२
२०२३*११४*१८९४*९०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com