ओमकार कुंभार याची निवड

ओमकार कुंभार याची निवड

ओमकार कुंभार याची निवड
इचलकरंजी ः नाईट कॉलेजच्या ओमकार कुंभार याची आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तो भारतीय संघाकडून खेळणार आहे. स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान चेनगुडू (चीन) येथे होणार आहेत. स्पर्धेसाठी तो ८०० मीटर धावणे या खेळ प्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करेल. त्याने नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत कास्यपदक प्राप्त केले होते. संस्थेचे संचालक राहुल खंजिरे यांच्या हस्ते त्याचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. त्याला संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, उपाध्यक्ष बी. एस. मुरदंडे, सचिव शेखर पाटील, प्राचार्य डॉ. पी. डी. नारे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------
06788
इचलकरंजी : रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लब ऑफ दि डेफ इचलकरंजीचा पदग्रहण समारंभ झाला.
‘रोटरॅक्ट, इंटरॅक्ट’चे पदग्रहण
इचलकरंजी : रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लब ऑफ दि डेफ इचलकरंजीचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला. रोटरॅक्ट अध्यक्ष संदीप जाधव यांना रोटरीचे अध्यक्ष दीपक निगुडेकर यांनी कॉलर प्रदान केली. सचिव सचिन पाटील यांना पंकज कोठारी यांनी पिन प्रदान केली. नवीन इंटरॅक्ट अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना डी. एम. कस्तुरे यांनी कॉलर, तर सचिव हर्षद कांबळे यांना नितीन भागवत यांनी पिन प्रदान केली. प्रकाश गौड, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव पाटील, नितीन भागवत, डॉ. दिलीप देशमुख, मुकुंद माळी, श्रीनिवास दबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भरत पवार यांनी रोटरॅक्ट व सुहास गायकवाड यांनी इंटरॅक्ट क्लबचे अहवाल वाचन केले. रोटरी क्लबकडून रोटरॅक्ट व इंटरॅक्ट सदस्यांना २० झाडे देण्यात आली.
------
निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी
इचलकरंजी : सात वर्षांखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवारी (ता. २९) होणार आहे. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने स्पर्धा लायन्स ब्लड बँक येथे होणार आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहे. स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मुलामुलींना भाग घेता येईल. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----
‘वाढीव शुल्क कमी करा’
इचलकरंजी : यशवंतराव चव्हाण विद्यापीठ इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांचे शुल्क गतवर्षीपेक्षा दुप्पट वाढवले आहे. वाढीव शुल्क कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. रामेश्वर सपकाळ यांना देण्यात आले. ऋषिकेश पाटील, रोहित कोटकर, सौरभ चव्हाण, उमेश दरिबे, प्रतीक सावंत, किरण कोल्हापुरे, रमेश पासलकर आदी उपस्थित होते.
------
इचलकरंजी हायस्कूलमध्ये मार्गदर्शन
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सक्षम शाळा, सदृढ शाळा हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांनी अल्पवयीन मुला-मुलींबाबत घडणाऱ्या घटनांचे विवेचन करून पोक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी निर्भया पथकाचे कार्य, ११२ हेल्पलाईन क्रमांक व सायबर क्राईमबाबत माहिती दिली. निर्भया पथकाच्या स्वाती जाधव, अंकुश कुंभार, राजेंद्र पुजारी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत एस. पी. दिवटे यांनी केले. आभार डी. वाय. कांबळे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com