कबनूर तणाव

कबनूर तणाव

Published on

06791
कबनूरः घटनेच्या निषेधार्थ गावातील व्यवहार बंद राहिले.
....

फलक फाडल्याने कबनूरमध्ये तणाव

इचलकरंजी, ता.२६ : कबनूर येथील दत्तनगर भागात बजरंग दल संघटनेचा फलक फाडल्याने आज सकाळी मोठा तणाव निर्माण झाला.या घटनेचा भागातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. फलक फाडणाऱ्याला अटक करावी व चार दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास गाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान गावात दुचाकीवरुन निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते.
कबनूर येथील दत्तनगर भागात मुख्य मार्गावर बजरंग दलाने फलक लावला आहे. हा फलक कटरने फाडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर या परिसरात घटनेचे तीव्र पडसाद उमटले. हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दत्तनगर परिसरात घोषणाबाजी सुरू केल्याने भागातील सर्व व्यवहार आपोआप बंद झाले. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झाले. तासाभरानंतर जमावाला पोलिसांनी फलक फाडणाऱ्यां‍चा शोध घेऊन अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शांत झालेल्या जमावाने ग्रामपंचायतीने दत्तनगर भागात सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली.
दरम्यान, जमावाने गावातून दुचाकीवरुन निषेध फेरी काढत गाव बंदचे आवाहन केले. त्याला नागरिक, व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने आज कबनूर गाव बंद राहिले. शिवाजीनगर पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त दत्तनगर भागात तैनात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.