इचलकरंजी विदेशी सिगारेट विळखा

इचलकरंजी विदेशी सिगारेट विळखा

Published on

06798

फोटो - संग्रहित
...

वस्त्रनगरीत विदेशी सिगारेटचा धुमसतोय धूर

तरूणाई व्यसनाच्या आहारी ः प्रशासन सुस्तच

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता.२६ : विदेशी ब्रँडची वस्तू वापरणे म्हणजे दिखाऊपणाचे व श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. त्यात विदेशी ब्रँडच्या किमती सिगारेटचा स्टाईलिस्ट पध्दतीने झुरका मारत धूर सोडणारी वस्त्रनगरीतील तरूणाई आज व्यसनाच्या आहारी वाहत चालली आहे. विदेशी ब्रँडच्या प्रतिबंधित सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. शहरातील एका दुकानात विदेशी सिगारेटचा मोठा साठा जप्त केल्यानंतर हा काळा धंदा समोर आला. आता सुस्तावलेल्या अन्न व औषध प्रशासनानेही अशा विदेशी सिगारेट देशाच्या बाहेरच रोखायला हव्यात. मात्र दुर्दैवाने सरकारी यंत्रणेला याबाबत गांभिर्य नसल्याचे वास्तव चित्र आहे.
इचलकरंजी शहरात शासनाची बंदी असणाऱ्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई सातत्याने केली जाते. पण विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या रॅकेटकडे पोलिसांचे लक्ष जात नसल्याने शहरात विदेशी सिगारेटचा धूर धुमसत आहे. विदेशी सिगारेटच्या विक्रीवर देशात प्रतिबंध आहे. अशा सिगारेटची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश आहेत.
विक्रेत्याकडे या सिगारेटचे कोणतेच बिल नाही, उत्पादनाची व मुदत संपल्याची तारीख सिगारेटवर नाही. शरीराला घातक असलेला वैज्ञानिक इशाराही नाही. सिगारेट विदेशातून भारतात येत असल्याने यात मोठी यंत्रणा सक्रीय आहे. यातून मोठ्या सिगारेट पोहचतात. विषारी सिगारेटमुळे कॅन्सर होतो. येत्या काळात विदेशी सिगारेटचा बाजार करणाऱ्या पुरवठादारालाच शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
-----

ई-सिगारेट''चीही चलती

चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून ''ई-सिगारेट''चे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. यामुळे तरुणाईभोवतीचा ''ई-सिगारेट''चा विळखा सुटला असे वाटत असताना शहरात काही ठिकाणी ई-सिगारेट''चा धूर तरुणांना आकर्षित करत आहे. शहरात काही मोजक्या पानपट्टी, एजंटांकडून या सिगारेटची मागणी केली की पुरवठा होतो.
----

व्यापारी नफ्यात, ग्राहक तोट्यात

भारतीय सिगारेटच्या तुलनेत विदेशातून येणाऱ्या सिगारेट अर्ध्या किमतीत मिळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचा नफा दुप्पट होतो. ते पानटपरी चालवणारे, हॉटेल आणि बार संचालकांशी संगनमत करून सिगारेटची विक्री करतात. व्यापारी आणि सिगारेट विकणारे नफा कमावण्यासाठी विदेशी सिगारेटलाच प्राधान्य देतात. त्यावर छापील किमती नसल्याने ग्राहकांना वाटेल त्या किमतीत विकली जाते.
---
गोवामार्गे इचलकरंजी ते कर्नाटक

विदेशी सिगारेट विशेषतः थायलंडमधून समुद्रमार्गे चोरट्या मार्गाने कस्टम, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांना चकवा देत इचलकरंजीत येते. तेथून कोल्हापूर जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात पाठवले जाते. सिगारेटमध्ये वेलदोडे, लवंग, दालचिनी याशिवाय विशिष्ट प्रकारची नशा आणणारा तंबाखू असतो. भारतातील सिगारेट पाकीटात १० सिगारेट तर विदेशातील या पाकिटात २० सिगारेट असतात. एका सिगारेटची किंमत साधारण ३० ते ५० रूपये असते. कमी कालावधीत ते खराब होते.
---
कोट

‘विदेशी सिगारेटच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत. यापुढे माहिती मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कावाई केली जाईल. यावर पोलिस यंत्रणा कायम लक्ष ठेवून राहणार आहे. नागरिकांनीही यासंबंधात कुठलीही माहिती असल्यास पोलिसांना सूचना द्यावी.
- प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, गावभाग पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.