बँक अपहार फॉलअप

बँक अपहार फॉलअप
Published on

नुतन नागरी सहकारी बँकेतील
अपहारप्रकरणी कसून चौकशी
इचलकरंजी, ता.१८ : शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेतील ३.५८ कोटी अपहारप्रकरणी दिवसभर संशयिताकडे कसून चौकशी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. तसेच बँकेतील कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती गावभाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.
पदाचा गैरवापर करत नियमबाह्य कर्ज वाटप आणि बनावट व्हाउचरच्या माध्यमातून एकूण ३ कोटी ५८ लाख ३७ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे चेअरमन प्रकाश पुजारी यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली असून सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. आज अटकेतील संशयितांकडून अपहाराबाबत कसून चौकशी करण्यात आली. विविध पोलिस पथकांच्या माध्यमातून सुरेखा बडबडे, सर्जेराव जगताप, राहुल पाटील, सारीका कडतारे आणि कांचन पुजारी यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com