फसवणूक तिघांवर गुन्हा

फसवणूक तिघांवर गुन्हा
Published on

दामदुप्पटीचे आमिष दाखवून
फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

इचलकरंजीत तक्रारः ९ लाख रुपयांची फसवणूक
इचलकरंजी, ता.२८ : सांगली जिल्ह्यात दामदुप्पटीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीवर आता गावभाग पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अरविंद मारुती गुरव (वय ४५), सीमा अरविंद गुरव (वय ४०, रा. शिरढोण, ता. शिरोळ) या पती-पत्नीसह नितीन गजानन माळी (४०, रा. इस्लामपूर) अशा तिघांचा समावेश आहे. त्यांनी एका महिलेची ९ लाख २० हजार ८०० रुपयांची फसवणूक करत बदनामी केली आहे. याप्रकरणी ज्योती प्रविण गोंडाजे (वय ४०, रा.कुपवाड, जि.सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओम साई होम अप्लायन्स कंपनीच्या कार्यालयात अरविंद गुरव, सीमा गुरव आणि नितीन माळी हे तिघे मिळून दामदुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून करारपत्र घेत होते. अशाच पद्धतीने जादा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवत तिघांनी ज्योती गोंडाजे यांचा विश्‍वास संपादन केला. गोंडाजे यांनी रोख स्वरूपात ९ लाख २० हजार ८०० रुपये गुंतवले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भरलेली रक्कम देण्यास तिघांनी सतत टाळाटाळ केली. भरलेल्या रक्कमेबाबत विचारणा केल्यावर गोंडाजे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. तसेच बदनामीही सुरू केली होती. त्यामुळे फसवणूक आणि बदनामी करत असल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गोंडाजे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
...

पोलिसांकडून कसून तपास
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अरविंद गुरव याने अनेकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुरव आणि नितीन माळी या दोघांवर विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com