गणपती महायज्ञात योग, ध्यान शिबिर
07859
इचलकरंजी : गणपती महापुराण कथेचे निरूपण करत संवित कैलासचंद्रजी जोशी यांचे प्रवचन झाले.
-----------
गणपती महायज्ञात योग, ध्यान शिबिर
ितिसरा दिवस ः दुपारी संवित कैलासचंद्र जोशींचे प्रवचन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : भव्य १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात योग व ध्यान शिबिराने झाली. आर्ट ऑफ लिव्हींगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र झाले. उपस्थित भक्तगण, नागरिकांनी योगाची प्रात्यक्षिके करत ध्यान शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर आता महायज्ञ सोहळ्यात दररोज सकाळच्या सत्रात चालणार आहे.
त्यानंतर नियमित सकाळी आठ वाजता श्री १०८ गणपती महायज्ञास सुरुवात झाली. दुपारी संवित कैलासचंद्रजी जोशी (जोधपूर) यांच्या गणपती महापुराण कथेला महिलांसह नागरिकांची गर्दी झाली होती. श्री गणेशाने आपल्या आई-वडिलांमध्ये चरणाला स्पर्श करत विश्व पाहिले. तसेच प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांमध्ये विश्व पाहल्यास जगण्याची व्यापक दृष्टी मिळेल, असे जोशी यांनी निरूपण करताना सांगितले. तसेच आजपासून पंडित अक्षयजी अनंतजी गौड यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय नानीबाई का मायरा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीवर आधारित या संगीत कथेत भक्तगण रमून गेले.
दरम्यान आज महायज्ञ सोहळ्याला माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. महायज्ञ सोहळ्याची विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला भेट देत माहिती दिली. श्री श्री १०८ सीतारामदास महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक अजित जाधव, दिलीप मुथा, युवराज माळी, मिश्रीलाल जाजू उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.