
लोगो :ः गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर व्याख्यानमाला
---------------
08090
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेत ''जीवन सुंदर आहे'' या विषयावर गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
----------
चेहऱ्यावर हास्य ठेऊन आनंदी रहा
गणेश शिंदे : ‘जीवन सुंदर आहे’वर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची साधने आली. यातून जगणे सोपे झाले. मात्र, माणूस सुखी झाला नाही. संपत्ती आनंद देत नाही, हे स्वतःला ठामपणे सांगा. ईर्षा, द्वेष, अहंकाराची जळमट बाजूला सारत अंतर्मनात डोकावून पाहता आले पाहिजे. जगण्यातील मजा ओळखा, नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि आनंदी राहा, असा उपदेश सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार गणेश शिंदे यांनी केला.
इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे आयोजित गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले. मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर मार्गदर्शन करत आनंदाचे स्वरूप, व्याख्या, परिस्थिती आणि वस्तुस्थिती स्पष्ट करत रसिकांना जगण्याचा आनंदी मार्ग दाखवला. व्याख्यानमालेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. उपायुक्त सोमनाथ आढाव, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक अजितमामा जाधव, शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, ग्रंथपाल बेबी नदाफ, आदी उपस्थित होते.
माणूस आनंद स्वरूपच आहे. मात्र, त्या परिवर्तनाची सुरुवात माझी माझ्यापासून व्हायला हवी. आनंद आणि दुःख हे आपले असून, आता आपले राहिले नाही. दोहोंच्या न संपणाऱ्या तुलनेत आपण जगत असल्याने सगळे जगाला दाखवत बसलो आहोत. संभाव्यता, शंका, भीती यामुळे आपलाच आनंद आपल्याला घेता येत नाही. या कमालीच्या व्यस्ततेत एक दिवस आपल्याच कार्यक्रमात आपणाला गैरहजर राहण्याची वेळ येणार असल्याची जाणीव श्री. शिंदे यांनी अनेक उदाहरणांसह करून दिली.
एकांतात विचारावर तर समाजात शब्दांवर नियंत्रण आणत मनाला स्थिर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. निसर्ग सुंदर असून, माणूस निसर्गाचाच घटक आहे. निसर्गावर माणूस मात करायला चालला आहे. हेवेदावे मागे ठेवून निसर्गाशी जुळवून घेता आले पाहिजे. श्वासावर निसर्गाचा अधिकार असून, शरीराची बॉडी होण्यापूर्वी जगायला शिका. स्पर्श आहे तोपर्यंतच नाती आहेत. त्यामुळे हरवून गेलेल्या भावना जपा आणि आई-वडिलांचा सन्मान राखा, असा अनमोल उपदेश त्यांनी दिला.
-----
शब्द जपून वापरा
शब्द हे शस्त्र असून, शब्दांची चळवळ उभी राहिली आहे. गरिबी हटाओ, अच्छे दिन या केवळ शब्दांनी देशात सरकार आली आहेत. काही वेळा शब्द वापरला नाही तरी न वापरण्यातही मोठी ताकद आहे. त्यामुळे शब्द जपून वापरल्यास जीवन अधिक सुंदर होते, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.